Har Ghar Tiranga sakal
देश

Har Ghar Tiranga : सोशल मीडियावरचा DP बदला; 'हर घर तिरंगा'वरून पंतप्रधान मोदींचे आवाहन

येणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सोशल मीडियावरील डीपी बदलण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दत्ता लवांडे

नवी दिल्ली : भारताचा 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी आपल्या सोशल मीडियावरील डीपी बदलण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलं आहे. येणारा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी पाठिंबा देण्याचंही आवाहन त्यांनी केलं आहे. ट्वीटरवरून पोस्ट करत त्यांनी ही माहिती दिली आहे.

"हर घर तिरंगा" या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी आपण आपल्या सोशल मीडिया खात्यांचा DP बदलू आणि या अनोख्या प्रयत्नाला पाठिंबा देऊ ज्यामुळे आपला प्रिय देश आणि आपल्यातील बंध अधिक घट्ट होतील." असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं असून स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचे आवाहन केलंय.

दरम्यान, यावर्षी देशाचा 76 वा स्वातंत्र्यदिन आहे. मागच्या वर्षी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला होता. यावेळी प्रत्येक घरावर तिरंगा फडकावण्यात आला होता. तर प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकावून त्याचे फोटो हर घर तिरंगाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे आणि सोशल मीडियावर पोस्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदींनीही बदलला डीपी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून डीपी काढून तिरंग्याचा फोटो अपडेट केला आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी प्रत्येकाने आपला डीपी बदलून तिरंग्याचा डीपी ठेवण्याचे आवाहन केलंय. अनेक नेत्यांनीही आपले डीपी बदलून तिरंग्याचा फोटो ठेवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebola Cases: कोरोना विसरा... आता भारताच्या दारात ‘इबोला’! बंगळूरमध्ये महिला विलगीकरणात, नागपूरमध्येही वाढली चिंता

Chhatrapati Sambhajinagar: शेतकरी महिला चढली पाण्याच्या टाकीवर; फेर रद्दच्या मागणीसाठी आंदोलन; पैठण तहसील परिसरातील प्रकार

SRH vs RR, Eliminator: हैदराबाद की राजस्थान, आज कोण होणार 'एलिमिनेट'? पाहा संभावित प्लेइंग इलेव्हन

Latest Marathi News Live Update : भरधाव कारने ७५ वर्षीय महिलेला उडवलं, चालक अपघातानंतर फरार

Konkan Railway: ब्रिटिशांनाही अशक्य वाटलेली कोकण रेल्वे प्रत्यक्षात आणणारे मधु दंडवते, सावंतवाडी स्थानकाला नावासाठी अनेक वर्षे संघर्ष

SCROLL FOR NEXT