Hardeep Singh Puri Cooking gas connection price rise double central government domestic gas cylinder Sakal
देश

गॅसचे दर वाढत असूनही कनेक्शनचे प्रमाण दुप्पट - हरदीपसिंग पुरी

देशात २०१४ नंतर स्वयंपाकाच्या गॅस कनेक्शन धारकांची संख्या दुपटीहून अधिक वाढल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशात २०१४ नंतर स्वयंपाकाच्या गॅस कनेक्शन धारकांची संख्या दुपटीहून अधिक वाढल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. दरवाढीने उच्चांक गाठलेला असताना दुसरीकडे हा आकडा वाढत आहे. ही संख्या २०१४ नंतर साडेचौदा कोटींवरून ३० कोटी ३९ लाखांवर पोहोचली आहे, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आज सांगितले. आगामी काळात जास्तीत जास्त देशवासीयांना पाईपलाईनद्वारे स्वयंपाकाच्या गॅसचा (पीएनजी) पुरवठा करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने समोर ठेवले आहे. २०१४ मध्ये ४१० रुपयांना असणारा गॅस सिलिंडर सध्या एक हजार रुपयांचा टप्पा ओलांडून गेल्याने गृहिणींचेही बजेट कोलमडले आहे.

एकीकडे गॅसबाबत ही स्थिती असताना हॉटेलची किंवा रस्त्यावरील स्टॉलची वाट धरू इच्छिणाऱ्या सर्वसामान्यांना बाहेर वडापावपासून राईस प्लेटपर्यंत काही खाणेही जिवावर येण्यासारखी परिस्थिती आहे. अलीकडे केंद्र सरकारने गॅस सिलिंडर स्वस्त केला पण ती २०० रुपयांची सूट सामान्यांसाठी नसून फक्त उज्ज्वला योजना लाभार्थींसाठी आहे. हे दर किती वाढतील याचा अंदाज कोणालाच नाही. मागच्या आठ वर्षांत गॅस सिलिंडरच्या व पाईपलाईनद्वारे येणाऱ्या गॅसच्याही दरांत दुपटीहून जास्त वाढ झाली. त्याच काळात सिलिंडरधारकांची संख्याही वाढली असे केंद्राने म्हटले आहे.

पुरी यांनी सांगितले की २०१४ मध्ये देशात २४ लाख पीएनजी कनेक्शनधारक होते. ही संख्या सध्या ९० लाख ९० हजार इतकी झाली आहे. या काळात देशातील सीएनजी केंद्रांच्या संख्येतही ९३६ वरून ४००० पेक्षा जास्त इतकी वाढ झाली आहे. मागील आठ वर्षांतील मोदी सरकारच्या काळात पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करण्याचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढले आहे. २०१४ मध्ये देशात पेट्रोलमध्ये एक पंचमांश टक्के इथेनॉलचे मिश्रण होत असे. २०२२ मध्ये हे प्रमाण ९.९ टक्के झाले असून आगामी काळात ते २० टक्क्यांवर नेण्याचे लक्ष्य सरकारने समोर ठेवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav: आमचं तिकीट बुक झालंय... भारत - पाकिस्तान सामन्याच्या वादावर सूर्यकुमारने स्पष्टच बोलला

Coal Mine Blast : कोळसा खाणीत भीषण स्फोट!, दहा कामागारांचा मृत्यू ; अनेक कामगार अडकले असल्याचीही भीती

Viral Video: लाईक्सच्या नादात काहीही! दिल्ली मेट्रोत तरुणाचा अतरंगी डान्स, नेटकरी हैराण

Mangalwedha Election 2026 : मंगळवेढ्यात निवडणुकीची प्रशासकीय यंत्रणा सज्ज, मतदारांसाठी मताधिकार हे मोबाईल ॲप

Mumbai Local चा घाम न घालवता प्रवास; पण भाडं डोळ्यात पाणी आणणारं! २० मिनिटांच्या प्रवासासाठी ₹७० खर्च, प्रवाशांची नेमकी मागणी काय?

SCROLL FOR NEXT