PM Modi_Jo Biden 
देश

PM Modi USA Visit : "AI हेच फ्युचर"; PM मोदींच्या अमेरिका दौऱ्यावर हरदीपसिंग पुरींचं महत्वाच विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकतीच अमेरिका दौरा पार पडला, यावर केंद्रीय मंत्र्यांनी भाष्य केलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकतीच अमेरिका दौरा पार पडला, या दौऱ्यानं काय साध्य केलं हे सांगताना केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी महत्वाचं विधान केलं आहे. सध्या आर्टिफिशिअल इंटिलिजन्समुळं (AI) जग मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर आहे. याच अनुषंगानं त्यांनी मोदींच्या अमेरिका भेटीचं महत्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे. (Hardeep Singh Puri speaks on PMs state visit to the US AI is the future America India is the future)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याबाबत बोलताना पत्रकार परिषदेत हरदीपसिंग पुरी म्हणाले, हाच तो क्षण आहे. ज्यामध्ये द्विपक्षीय भेट अर्थात भारत अमेरिका संबंध नवी पहाट निर्माण करत आहे. हेच या भेटीचं महत्व आहे. AI अर्थात America India हेच फ्युचर अर्थात भविष्य आहे, असंही पुरी यावेळी म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तीन दिवसीय अमेरिका दौरा नुकताच संपन्न झाला. PM मोदी आपल्या ९ वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच अमेरिकेच्या अधिकृत राजकीय दौऱ्यावर गेले होते. त्यामुळं मोदींचं तिथं चांगलं स्वागत झालं. त्यांनी अमेरिकेनं काँग्रेसमध्ये संबोधितही केलं. यावेळी भारतील लोकशाहीचा पाठ त्यांनी उद्धृत केला. तसेच अमेरिकेतील मीडियासमोर पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरही दिली. यावेळी त्यांना अमेरिकेत आणि भारतातील विरोधकांकडून टीकेचा सामनाही करावा लागला.

अमेरिकेतील कॉर्पोरेट्स क्षेत्रातील सर्व भारतीय वंशाचे प्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींची भेट घेत सविस्तर चर्चा केली. तसेच द्विपक्षीय बैठकीत भारतातील रोजगार, गुंतवणूक, संरक्षणविषयक मुद्दे तसेच परराष्ट्र व्यवहार अशा विविध मुद्द्यांवर चर्चाही झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT