Hardeep Singh Puri on Maharashtra Fuel price sakal media
देश

Hardeep Singh Puri : इंधनाचे दर नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न; हार्दिक सिंग पुरी

पेट्रोलियम मंत्र्यांचा दावा; उज्ज्वला योजनेत आठ कोटी सिलिंडर वाटपाची माहिती

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : इंधनासाठी आयातीवर असलेला भर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भडकलेले दर अशी स्थिती असताना सरकारने पेट्रोल डिझेलच्या किमती शक्य तेवढ्या कमी राखण्याचा प्रयत्न केला आहे असा दावा केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हार्दिक सिंग पुरी यांनी आज लोकसभेत केला.

लोकसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासात इंधनाशी संबंधित प्रश्नाला उत्तर देताना पेट्रोलियम मंत्री म्हणाले, की आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधनाची दरवाढ होऊ नये सरकारने सर्वसामान्यांवर भार वाढू नये यासाठी शक्य तेवढ्या किमती नियंत्रणात राखण्याचा प्रयत्न केला आहे.

६ एप्रिल २०२२ पासून पेट्रोल, डिझेलचे दर वाढलेले नाहीत. उज्ज्वला योजनेमध्ये गरीब कुटुंबांना विशेष सवलती दिल्या आहेत. त्यामुळे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे आधीच्या तुलनेत आणखी सिलिंडर खरेदी करत आहेत, असा दावाही पेट्रोलियम मंत्र्यांनी केला.

उज्ज्वला योजनेमध्ये आठ कोटी सिलिंडरचे वाटप झाल्याचे देखील ते म्हणाले. गॅसचे दर वाढल्यामुळे यावर दिल्या जाणाऱ्या औषधांचा गरीब कुटुंबांना काहीही फायदा होत नसल्याचा प्रश्नकर्त्या खासदारांचा आक्षेप होता.

पेट्रोलियम मंत्री म्हणाले, की उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलिंडरची मागणी आता दरवर्षी सरासरी ३.६८ सिलिंडर एवढी झाली आहे. कोरोनाच्या काळात सरकारने सर्व गरीब कुटुंबांना तीन सिलिंडर मोफत उपलब्ध करून दिले.

तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देखील पुरविण्यात आले. आगामी आर्थिक वर्षांत भारतात नैसर्गिक वायूचे उत्पादन १८ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा असल्याचे पेट्रोलियम मंत्री हार्दिक सिंग पुरी यांनी सांगितले. ते म्हणाले, की मागील आर्थिक वर्षात देशात नैसर्गिक वायूचे उत्पादनात १८ टक्क्यांनी वाढ झाली तर आगामी वर्षातही एवढ्याच प्रमाणात नैसर्गिक वायूचे उत्पादन वाढणे अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: भारताविरुद्ध शाय होपच्या नाबाद १६२ धावांनी मोडला ३७ वर्षांचा रेकॉर्ड; रोहित-डिव्हिलियर्सलाही टाकले मागे

IND vs WI,3rd ODI: शाय होपचं दीडशतक अन् वेस्ट इंडिजचा सर्वात मोठा विजय; मात्र भारताने जिंकली मालिका

PM झालो तर काय करेन? संजय दत्तचं मुन्नाभाई स्टाईलने उत्तर, ट्रम्प यांना म्हणाला...'मामू, तुम भटक गए हो' पंतप्रधान मोदींवरही टोलेबाजी

IND vs WI, 3rd ODI मध्ये ड्रामा! गुरनूर ब्रार ओव्हर अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला, तर रुदरफोर्डच्या विकेटवरूनही वाद

Beed News : येत्या आठवड्यात कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक बीडच्या कारागृहात येणार; वादग्रस्त 'कॉल रेकॉर्डिंग' अन् अवैध कारभाराची स्वतः करणार झाडाझडती

SCROLL FOR NEXT