Hardik Patel 
देश

तुम्ही 'चौकीदार', तर मी 'बेरोजगार' : हार्दिक पटेल

वृत्तसंस्था

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या 'मैं भी चौकीदार' या मोहिमेनंतर पाटीदार नेते व काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार हार्दिक पटेल यांनीही ट्विटरवर अकाऊंटवर आपल्या नावापुढे 'बेरोजगार' असे लावले आहे. त्यामुळे आता त्यांचे नाव 'बेरोजगार हार्दिक पटेल' असे दिसत आहे.

मोदींनी आपल्या नावापुढे चौकीदार लावल्यानंतर भाजपतील सर्व मोठ्या नेत्यांनी व मंत्र्यांनी आपल्या नावापुढे चौकीदार लावले आहे. 'तुमचा चौकीदार खंबीरपणे उभा आहे व देशाची सेवा करत आहे. पण मी एकटा नाही. जो भ्रष्टाचाराविरुद्ध लढतो, अस्वच्छतेविरूद्ध लढतो, समाजातील दुष्ट शक्तींविरोधात आवाज उठवतो तो प्रत्येकजण चौकीदार आहे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी जो झटतो आहे तो चौकीदार आहे. आज प्रत्येक भारतीय म्हणतोय - #MainBhiChowkidar' असे ट्विट केले होते. यालाच उत्तर देत पटेल यांनी नवीन 'बेरोजगार' मोहिम सुरू केली आहे. 

भाजप सत्तेत आल्यापासून बेरोजगारी वाढली आहे. अनेक शिक्षित तरूण केवळ नोकरी नसल्यामुळे बेरोजगार आहे. त्यामुळे हार्दिक पटेल यांनी 'बेरोजगार' असे नाव लावून पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pre-Monsoon Rain Alert India : पुढील तीन दिवसांत मुसळधार पाऊस; IMD कडून 'या' राज्यांना अलर्ट जारी, एल निनोचं संकट तरीही 2026 मध्ये धो-धो कोसळणार!

inspiring Story: ६७ वर्षीय ‘तरुणा’ची कमाल! वर्षभराच्या श्रमदानातून डोंगर खोदून साडेतीन किमी रस्ता तयार, नानांची जिद्द ठरली आदर्श..

कौटुंबिक वादातून आईने अडीच वर्षांच्या मुलाला पाच लाखात विकलं, धक्कादायक प्रकरण समोर; कुठं घडला प्रकार?

Shwetank Tambe: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमधील तरुण नेत्याचं अपघाती निधन; घटनेनं हळहळ

NSE Gold: आता Demat मध्येही ठेवता येणार सोनं! NSE ची नवी डिजिटल गोल्ड योजना सुरू; नेमकं काय आहे EGR?

SCROLL FOR NEXT