Hardik Patel ask Question to congress Sakal
देश

काँग्रेसचा हात सोडून हार्दिक पटेल भाजपात; प्रवेशाची तारीखही ठरली!

काँग्रेस नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत काही दिवसांपूर्वीच हार्दिक पटेलने काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला होता.

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेले गुजरातचे नेते हार्दिक पटेल लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. या पक्ष प्रवेशाची आता तारीखही ठरली आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दल नाराजी व्यक्त करत हार्दिक पटेल यांनी राजीनामा दिला होता. यामध्ये त्यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते, तसंच नेतृत्व कामापेक्षा वरिष्ठांची मर्जी जपण्यात, कृती न करता सरकारच्या धोरणावर टीका करण्यातच धन्यता मानतात, असं म्हटलं होतं. (Hardik Patel will Join BJP on 2nd June.)

हार्दिक पटेल (Hardik Patel) भाजपात प्रवेश करणार अशा चर्चा त्यांनी राजीनामा दिल्यापासूनच सुरू होत्या. मात्र त्याबद्दल अद्याप कोणी काही ठोस माहिती दिलेली नव्हती. पण आता स्वतः हार्दिक पटेल यांनीच या गोष्टीची पुष्टी केली आहे. हार्दिक पटेल २ जून रोजी भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.

हार्दिक पटेल यांनी काही दिवसांपूर्वी भाजपाच्या कामाची स्तुती करत काँग्रेसवर टीका केली होती. वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे आता पटेल यांची नाराजी आणि त्यांचा राजीनामा काँग्रेसला महागात पडणार आहे.

हार्दिक काँग्रेसचा हात सोडणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होत्याच. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हार्दिकने अयोध्येतील राम मंदिर आणि काश्मिरमधून कलम ३७० हटवल्याचा उल्लेख करत भाजपाचं कौतुक केलं होतं. त्यानंतर आता राजीनामा देत पटेल यांनी नवा राजकीय मार्ग शोधला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जस्टिस यशवंत वर्मा प्रकरणात 'एफआयआर'ची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Asian Games 2026: १३ वर्षांच्या शाळकरी मुलीनं जिंकलं 'Gold'; भल्याभल्यांना जे नाही जमलं, ते करून दाखवलं

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

SCROLL FOR NEXT