Kiran Choudhary joins BJP : 
देश

Kiran Choudhary joins BJP : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला खिंडार! माजी मुख्यमंत्र्यांची सून भाजपमध्ये दाखल

Kiran Choudhary joins BJP : हरियाणातील काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा यांचे राजकीय विरोधक मानल्या जाणाऱ्या किरण चौधरी यांनी पक्षातील गटबाजीतून पक्ष सोडल्याचे मानले जात आहे.

सकाळ वृ्त्तसेवा

नवी दिल्ली, ता. १९ः हरियाणाचे माजी मुख्यमंत्री चौधरी बन्सीलाल यांच्या सून किरण चौधरी व त्यांच्या कन्या माजी खासदार श्रुती चौधरी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर आलेल्या असताना काँग्रेसला पडलेले हे खिंडार महत्त्वाचे मानले जात आहे.

हरियाणातील काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा यांचे राजकीय विरोधक मानल्या जाणाऱ्या किरण चौधरी यांनी पक्षातील गटबाजीतून पक्ष सोडल्याचे मानले जात आहे. लोकसभा निवडणुकीत श्रुती चौधरी यांना उमेदवारी सुद्धा मिळू शकली नाही. यामुळे नाराज असल्याने किरण चौधरी व श्रुती चौधरी यांना काँग्रेसला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात या दोघींचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री नायबसिंग सैनी, माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर उपस्थित होते.

यावेळी बोलताना किरण चौधरी यांनी हरियाणा काँग्रेसमधील हुड्डा पिता-पुत्रांच्या वाढत्या प्रभावावर टीका केली. हरियाणात काँग्रेसचे व्यक्तीकेंद्रित राजकारण आहे. यामुळे पक्ष सोडण्याची वेळ कार्यकर्त्यांवर येत असल्याचा आरोप त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जस्टिस यशवंत वर्मा प्रकरणात 'एफआयआर'ची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Asian Games 2026: १३ वर्षांच्या शाळकरी मुलीनं जिंकलं 'Gold'; भल्याभल्यांना जे नाही जमलं, ते करून दाखवलं

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

SCROLL FOR NEXT