Haryana Rajya Sabha Election
Haryana Rajya Sabha Election  esakal
देश

Congress : एका मतानं बिघडलं गणित अन् काँग्रेसच्या बड्या नेत्याचा झाला पराभव

सकाळ डिजिटल टीम

राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसलाय.

Haryana Rajya Sabha Election : हरियाणात काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसलाय. त्यांचे ज्येष्ठ नेते अजय माकन (Ajay Maken) यांचा राज्यसभा निवडणुकीत पराभव झालाय. काँग्रेस पक्षानं निवणुकीपूर्वीच आपला विजय घोषित केला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हायव्होल्टेज ड्राम्यामुळं समीकरणं इतकी बिघडली की, अपक्ष कार्तिकेय शर्मा राज्यसभेत पोहोचले.

माकन का हरले?

रिटर्निंग ऑफिसर आरके नंदल यांनी सांगितलं की, भाजप नेते पंवार यांना 36 मतं मिळाली, तर कार्तिकेय शर्मा यांना 23 प्रथम पसंतीची मतं मिळाली आणि 6.6 मतं भाजपकडून हस्तांतरित झाली. त्यांची एकूण मतांची संख्या 29.6 झाली. या लढतीत माकन यांना 29 मतं मिळाली. मात्र, दुसऱ्या पसंतीचं मत न मिळाल्यानं त्यांचा पराभव झाला.

89 आमदारांनी केलं मतदान

राज्यसभा निवडणुकीत एक मत 100 इतकं मानलं जातं. हरियाणात 90 पैकी 89 आमदारांनी मतदान केलं, तर अपक्ष आमदार बलराज कुंडू यांनी मतदान केलं नाही. शिवाय, काँग्रेसचं एक मत निवडणूक आयोगानं रद्द केलं. त्यामुळं 88 मतं शिल्लक होती, म्हणजे 8800 मतं. दरम्यान, विजयासाठी 8800/3+1 म्हणजेच 2934 मतांची गरज होती. भाजपचे कृष्णलाल पंवार यांच्या विजयानंतर 66 मतं शिल्लक होती, जी कार्तिकेय यांच्याकडं हस्तांतरित करण्यात आली. कार्तिकेय शर्मा आणि अजय माकन यांना 29-29 (2900-2900) मतं मिळाली. दोघंही समान होते, पण भाजपला 66 मतं मिळाल्यानं कार्तिकेयची मतं 2966 झाली आणि ते विजयी झाले. काँग्रेसला क्रॉस व्होटिंग आणि एक मत अवैध ठरल्यानं हा सारा खेळ अंगलट आलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : शंभूराज देसाई यांनी बजावला मतदानाचा हक्क!

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Latest Marathi News Live Update: अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावनी सुरू; थोड्याच वेळात फैसला

Shekhar Suman: हिरामंडी फेम अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT