Randeep Surjewala esakal
देश

भाजपला मतदान करणारे 'राक्षस', महाभारताच्या भूमिवरुन त्यांना शाप देतो; सुरजेवाला यांच्या वक्तव्यावरुन वाद

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली- काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार आणि वरिष्ठ नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी एका कार्यक्रमाला संबोधित करताना भाजपला मतदान करणाऱ्यांना राक्षण म्हटलं आहे. जो भाजपला मतदान करतो तो राक्षसी प्रवृत्तीचा असतो. मी महाभारताच्या या भूमीवरुन त्याला शाप देतो, असं ते म्हणाले आहेत. काँग्रेस पक्षाने हरियाणातील उदय सिंह किल्ल्यावर जन आक्रोश आंदोलनाचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. (Haryana Congress MP Randeep Surjewala says Those who vote for BJP and are BJP supporters are of raakshas)

सुरजेवाला यांच्या वक्तव्यावरुन वाद-प्रतिवाद होत आहेत. भाजप नेते संबित पात्रा यांनी सुरजेवाला आणि काँग्रेस पक्षावर पलटवार केला आहे. काँग्रेस पक्ष आता लोकांना शिव्या देखील देऊ लागला आहे. संबित पात्रा यांनी 'एक्स'वर व्हिडिओ शेअर करत म्हटलंय की, वारंवार राजकुमाराला लॉन्च करणारा काँग्रेस पक्ष आता जनतेला शिव्या देऊ लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्या द्वेषाने आंधळे झालेले काँग्रेस नेते सुरजेवाला काय म्हणताहेत पाहा, भाजपला मत किंवा पाठींबा देणारी देशाची जनता राक्षस आहे.

एकीकडे १४० कोटी लोकांचे प्रधानसेवक मोदी आहेत. ज्यांच्यासाठी जनताच देवाच्या रुपात आहे आणि दुसरीकडे काँग्रेसला जनता राक्षश वाटते. लोक अशा लोकांना चांगले ओळखते. त्यामुळे येत्या काळात जनताच यांच्या द्वेषाच्या दुकानावर कुलूप लावेल, अशी टीका संबित पात्रा यांनी केली.

सुरजेवाला म्हणाले की, 'मनोहरलाल खट्टर आणि दुष्यंत चौटाला बाजारात लोकांचे भविष्य विकत आहेत. नोकरी नाही नोकरीच्या संधी तरी द्या. भाजपच्या राक्षसांनो तुम्ही राक्षस आहात.जो भाजपला मतदान करतो आणि त्यांचे समर्थन करतो तो राक्षस आहे.' भाजपचे नेते शहजाद पुनावाला यांनीही सुरजेवाल यांच्यावर टीका केली. काँग्रेस नेता सुरजेवाला अफजल गुरु जी आणि ओसामा जी म्हणत असतात, आज त्यांनी जनतेला राक्षस म्हटलं.काँग्रेस भारत मातेची हत्या आणि लोकशाहीची हत्या झाल्याचे म्हणते. सुरजेवाला लोकांना राक्षस म्हणत त्यांना शाप देत आहेत. निवडणुकीत लोक यांना धडा शिकवतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT