Farmers protest_Haryana DM Sakal Media
देश

हरयाणा: जिल्हाधिकाऱ्यांकडून आंदोलक शेतकऱ्यांची डोकी फोडण्याचे आदेश?

व्हिडिओ व्हायरल झाल्यानं खळबळ

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : हरयाणातील कर्नाल भागात भाजपच्या नेत्यांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांकडून शनिवारी लाठीचार्ज करण्यात आला. यामध्ये अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. शेतकऱ्यांनी भाजप नेत्यांना रोखण्यासाठी टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन केलं. भाजपच्या एका बैठकीसाठी हे नेते निघाले होते. दरम्यान, बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना शेतकऱ्यांची डोकी फोडण्याचे आदेश इथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काँग्रेसचे नेते श्रीनिवास बीव्ही यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यावर भाजप नेते वरुण गांधी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये जिल्हाधिकारी पोलिसांना आदेश देताना म्हणताहेत की, "इथून जो पुढे जाईल त्याचं डोकं फोडा. यासाठी कुठल्याही सूचनांची गरज नाही. कोणत्याही परिस्थितीत त्यांना या रेषेच्यापुढे येऊ द्यायचं नाही. आपल्याजवळ पुरेसे पोलीस आहेत. आपण दोन दिवसांपासून याठिकाणी तैनात आहोत. इथून पुढे एकही व्यक्ती जाता कामा नये. जर कोणी पुढं जातोय तर त्याचं डोक फुटलेलं असायला हवं. पण अद्याप हे जिल्हाधिकारी आहेत की आणखी कोणी हे स्पष्ट झालेलं नाही"

काँग्रेस नेते श्रीनिवास बीव्ही यांनी हा व्हिडिओ ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं की तालिबान आणि यांच्यामध्ये काय अंतर आहे? त्यानंतर भाजपचे नेते वरुण गांधी यांनी देखील हा व्हिडिओ ट्विट केला असून त्यात त्यांनी म्हटलं की, "मला वाटतंय की हा व्हिडिओ एडिट केलेला असेल जिल्हाधिकाऱ्यांनी असं म्हटलं नसेल. पण जर हे खरंच असेल तर हे कदापी स्विकारार्ह नाही. लोकशाही देशात आपल्या नागरिकांना अशा प्रकारची वागणूक दिली जाऊ शकत नाही"

सोशल मीडियावर हा व्हिडिओ अनेकांनी रिट्विट केला आहे. तसेच पोलिसांना अशा प्रकारचे आदेश देणं योग्य आहे का? असे प्रश्नही उपस्थित केले आहेत. तहसीन पूनावाला या युजरनं म्हटलं की, "एकीकडे आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत तर दुसरीकडे असं घडत आहे" यावर राहुल गांधी यांनी ट्विट करुन म्हटलं की, "पुन्हा एकदा शेतकऱ्याचं रक्त सांडलं आहे, लाजेनं मान झुकली भारताची"

दरम्यान, कर्नालच्या पोलीस अधीक्षकांचं म्हणणं आहे की, "शेतकऱ्यांना शांततेत आंदोलन करायला हवं होतं. त्यांचं म्हणणं आहे की, शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग जाम केला होता. यामुळं यायला जायला त्रास होतंय. त्यांनी म्हटलं की, शेतकऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. पण व्हिडिओमध्ये तर पोलीस शेतकऱ्यांना बेदम मारहाण करण्यात येत आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर सरन्यायाधीशांना वेळ मिळाला! विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची याचिका ऐकण्यास सुप्रीम कोर्ट तयार, पण सुनावणी कधी?

IND vs PAK: वैभव सूर्यवंशीचा पुढचा टार्गेट पाकिस्तान? Asian Games मध्ये कधी होऊ शकतो IND vs PAK सामना, जाणून घ्या

Accident News: भीषण दुर्घटना! टाटा सुमोवर दरड कोसळली, १३ जणांचा जागीच मृत्यू, काही जखमी, मृतांमध्ये चिमुकल्याचाही समावेश

NEET Protest: विद्यार्थी आंदोलनातून CJP च्या उदयानं काँग्रेसला मागे टाकलं? विरोधकांचं गणित कसं बदललं? जाणून घ्या संपूर्ण क्रोनॉलॉजी...

Ashadhi Ekadashi 2026: साबुदाणा भिजवायला विसरलात? न भिजवता बनवा उपवासाचे क्रिस्पी मेदूवडे!

SCROLL FOR NEXT