haryana former cm congress leader bhupinder singh hooda car accident in hisar  
देश

Bhupinder Singh Hooda Accident: हरियाणाच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, थोडक्यात बचावले प्राण

रोहित कणसे

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपिंदर सिंग हुडा यांच्या कारला रविवारी सकाळी हिसारमध्ये अपघात झाला. या अपघातात त्यांच्या कारचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. अचानक निलगाय समोर आल्याने ही घटना घडली. या अपघातात माजी मुख्यमंत्री सध्या थोडक्यात बचावले आहेत.

अपघातानंतर माजी मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली की, आज हिसारला जाताना माझ्या वाहनाला अपघात झाला, पण देवाच्या कृपेने आणि तुमच्या शुभेच्छांमुळे मी आणि माझा कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित आहोत. मी पुढे सर्व नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहीन.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झाला त्यावेळी भूपेंद्र सिंह हुड्डा कारच्या पुढील सीटवर बसले होते. अपघातानंतर माजी मुख्यमंत्रीही दुसऱ्या वाहनाने नियोजित कार्यक्रमात सहभागी झाले . अपघातावेळी माजी मुख्यमंत्र्यांसोबत माजी मंत्री जयप्रकाश, वीरेंद्र सिंह, धरमवीर गोयत, नरेश सेलवाल हे देखील कारमध्ये होते. त्यापैकी कोणालाही दुखापत झाली नाही.

हिसारचे पोलीस अधीक्षक गंगा राम पुनिया यांनी सांगितले की, अचानक एक नीलगाय रस्त्यावर आली आणि माजी मुख्यमंत्री हुड्डा यांच्या कारला धडकली, ज्यामुळे हा अपघात झाला. मात्र, ते थोडक्यात बचावला आणि वाहनातील इतर कोणालाही दुखापत झाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugauli Treaty: भारताविरोधात मदतीची मागणी, पण ब्रिटनने हात झटकले; नेपाळचे पंतप्रधान बालेन शाहांची कोंडी

Mumbai Local: जोरदार पावसातही लोकल सुसाट धावणार, रेल्वेचा खोळंबा टळणार; प्रशासनाने उचलले मोठे पाऊल

TVS Bike : फक्त 47 हजार किंमत; 30 दिवसांत 42,246 लोकांनी खरेदी केली 'ही' टू व्हीलर गाडी, 58 कि.मी. स्पीड

काम तर करायची नाहीच उलट... सुप्रिया पाठारेंना कामवालीचा आलेला असा अनुभव की त्यांनी हातच जोडले; म्हणाल्या-

Latest Marathi News Update : आजपासून मुंबई टी२० लीगला सुरूवात; वानखेडे स्टेडियमवर रंगणार ३० सामने

SCROLL FOR NEXT