gurmeet ram rahim 
देश

'डेरा'च्या मुख्यालयात फटाक्‍यांचा अवैध कारखाना

वृत्तसंस्था

शोधमोहिमेचा दुसरा दिवस; साध्वींच्या निवासापर्यंत गुप्त मार्ग

सिरसा: "डेरा सच्चा सौदा'च्या मुख्यालयात सुरू असलेल्या शोधमोहिमेचा आज दुसरा दिवस असून, येथे फटाक्‍यांची निर्मिती करणारा एक अवैध कारखाना सुरू असल्याची बाब समोर आली आहे. सुरक्षा यंत्रणेने डेराप्रमुख गुरमीत रामरहीम सिंग याच्या गुहेपासून साध्वींच्या वसतिगृहापर्यंत जाणारा एक गुप्त मार्गही शोधून काढला आहे.

पंजाब-हरियाना उच्च न्यायालयाने डेरा मुख्यालयाची झाडाझडती घेण्याचे आदेश दिल्यानंतर काल (ता. 8) निवृत्त न्यायाधीश ए. के. एस. पवार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. आज राबविलेल्या शोधमोहिमेत फटाके तयार करण्याचा कारखाना व त्यासाठी लागणारी रसायने आढळून आली. गुरमीत रहात असलेल्या गुहेपासून साध्वी निवासपर्यंत निघणारा एक गुप्त मार्ग तसेच, एक कृत्रीम बोगदाही सुरक्षा यंत्रणेने शोधून काढल्याची माहिती हरियाना माहिती व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक सतीश मेहरा यांनी दिली.

हा कारखाना अवैध असल्याचे सांगतानाच त्याचा वापर स्फोटके तयार करण्यासाठी होत असल्याची शक्‍यताही मेहरा यांनी व्यक्त केली. मुख्यालयात एका ठिकाणी "एके-47' बंदुकीच्या गोळ्यांचे काही रिकामे बॉक्‍सही आढळून आल्याचेही मेहरा यांनी सांगितले.

दरम्यान, कारवाईच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेली संचारबंदी कायम असून, डेराच्या मुख्यालयाकडे जाणारे रस्ते वाहतुकीसाठी अद्याप बंद ठेवण्यात आले आहेत.

चामकौर, दान सिंगला अटक
चंडीगड ः "डेरा'प्रमुख गुरमीतला न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर हिंसा भडकविण्यास कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून चामकौर सिंग व दान सिंग या दोघांना चंडीगड येथून अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. चामकौर हा डेराच्या पंचकुला केंद्राचा प्रमुख असून, दान सिंग हाही मुख्य पदाधिकाऱ्यांपैकी एक आहे. दरम्यान, गुरमीतचा अंगरक्षक व पोलिस कमांडो असलेल्या करमजीत सिंग यालाही पोलिसांनी अटक केली आहे. पंचकुलातील न्यायालयाच्या आवारातून गुरमीतची सुटका करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यात करमजीतचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : महापूजेवेळीही भाविकांसाठी श्री विठ्ठलाचे मुखदर्शन सुरू; पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून 20 किमी अंतरावर, पंढरपुरात 30 लाखांहून अधिक भाविकांचा महापूर

What is The Significance Of Pandharpur Wari? पाऊले चालती पंढरीची वाट...

Pandharpur Ashadhi Ekadashi : "बा विठ्ठला, राज्यातील प्रत्येक शेतकरी सुखी राहू दे..."; शासकीय महापूजेनंतर CM फडणवीसांचे पांडुरंगाला साकडे

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : CM देवेंद्र-अमृता फडणवीसांच्या हस्ते विठूरायाची महापूजा; मुख्यमंत्र्यांनी काय मागितलं मागणं?

SCROLL FOR NEXT