haryana wrestler nisha dahiya  sakal
देश

VIDEO : कुस्तीपटू निशा दाहियावरील गोळीबाराचे वृत्त खोटं

या दोघांसोबत त्यांची आई देखील घटनास्थळी होती, असे वृत्त पसरले होते.

सुशांत जाधव

राष्ट्रीय कुस्तीपटू निशा दाहिया हिच्यावर गोळीबार झाल्याची घटना चुकीचे असल्याचे समोर आले आहे. हरयाणातील सोनीपतस्थित सुशील कुमार अकादमीच्या परिसरात बुधवारी अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटू निशा दहिया आणि तिच्या भावाचा मृत्यू झाल्याचे वृत्त अनेक प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले होते. यासंदर्भात खुद्द निशाने एक व्हिडिओ शेअर केलाय. यात तिने सुरक्षित असल्याचे सांगत बातमी खोटी असल्याचे म्हटले आहे.

सर्बियाच्या बेलग्रेड येथे झालेल्या अंडर-23 जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत निशाने 65 किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली होती. कांस्य पदक मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अन्य खेळाडूंसह निशा दाहियाचे कौतुक केले होते. तिच्या यशाची चर्चा सुरु असताना अचानक बुधवारी तिच्या निधनाचे वृत्त समोर आले. निशा दाहियासह तिच्या भावावर गोळ्या झाडण्यात आल्याती बातमी वाऱ्यासारखी पसरली होती.

कुस्तीपटूसंदर्भात पसरणारी बातमी केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही प्रसारमाध्यमांनी पोलिसांचा हवाले निशा आणि तिच्या भावाची हत्या झाल्याचे वृत्त दिले होते. या बातमीनंतर सर्वत्र एकच खळबळ माजली होती. त्यानंतर कुस्ती महासंघाने एका व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये निशा दाहिया कुस्तीपटू साक्षी मलिकसोबत दिसत आहे. मी सुरक्षित आहे. गोंडा येथे राष्ट्रीय स्तरावरी स्पर्धेत सहभागी घेण्यासाठी आले आहे. मीडियाच्या माध्यमातून ज्या बातम्या पसरल्या आहेत ती फक्त अफवा आहे, असे निशा या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगताना दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वाहतूक पोलिसाची दुचाकीस्वाराला शिवीगाळ! ‘एसीपी’ म्हणाले, वाहतूक पोलिसांना दिले जाणार चांगले वागण्याचे धडे; सहायक पोलिस आयुक्तांची झाली आदलाबदली

Ragi Ghavan: ग्लूटेन-फ्री नाश्ता हवाय? मग ही नाचणीच्या घावणाची रेसिपी नक्की ट्राय करा

Horoscope: पैशांच्या बाबतीत नशीबवान असतात ‘या’ 5 राशी; कमाईसोबत पैसा टिकवण्यातही पुढे!

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

SCROLL FOR NEXT