Latur, Udgir Accident  Esakal
देश

School Bus Accident : हरियाणामध्ये पुन्हा विद्यार्थ्यांच्या गाडीला अपघात; चिमुकलीचा मृत्यू, पाच जखमी

अपघातामध्ये मृत पावलेल्या विद्यार्थीनीचं नाव हिमानी असं आहे. हिमानी ही तिसरीच्या वर्गात शिकत होती. अपघातानंतर नातेवाईकांनी तिला एका रुग्णालयात नेलं होतं. परंतु तिचा मृत्यू झाला होता. यमुनानगर येथील कमाली चौक येथे ही दुर्घटना घडली आहे.

संतोष कानडे

Bus Accident News : हरियाणाच्या महेंद्रगडनंतर आता यमुनानगरमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांच्या रिक्षाला अपघात झाला आहे. या घटनेत एका चिमुकलीचा मृत्यू झाल्याची माहिती असून इतर पाच जण जखमी झाले आहेत. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

Tajya Batmya

मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणा येथील यमुनानगर येथे मुलांच्या रिक्षाला अपघात झाला. त्या रिक्षामध्ये शाळकरी विद्यार्थी होते. रिक्षा आणि मोटारसायकलची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. यामध्ये एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाला आहे. तर पाच मुले जखमी झाले आहेत.

अपघातामध्ये मृत पावलेल्या विद्यार्थीनीचं नाव हिमानी असं आहे. हिमानी ही तिसरीच्या वर्गात शिकत होती. अपघातानंतर नातेवाईकांनी तिला एका रुग्णालयात नेलं होतं. परंतु तिचा मृत्यू झाला होता. यमुनानगर येथील कमाली चौक येथे ही दुर्घटना घडली आहे.

रिक्षा चालकाने लाल सिग्नल तोडल्याची माहिती येत आहे. त्यानंतरच बाईक आणि ऑटोचा गंभीर अपघात झाला. यात अपघातामध्ये दुर्दैवाने एका चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.

यापूर्वी हरियाणा येथील महिंद्रगड येथील कनीनी येथे ११ एप्रिल रोजी एका स्कूल बसचा अपघात झाला होता. या घटनेत सहा मुलांचा मृत्यू झाला होता. बस चालक दारु पिऊन बस चालवत असल्याचं पुढे आलं होतं. या घटनेनंतरही चालकांनी धडा घेतलेला नाही. त्यामुळेच पुन्हा एक अपघात झाला आहे. हरियाणा सरकारने बस अपघातानंतर शाळेच्या बसेस तपासण्याची मोहीम हाती घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT