Prajwal Revanna Esakal
देश

Hassan Sex Scandal: माजी पंतप्रधानांच्या नातवाच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

Prajwal Revanna: महिलांवरील लैंगिक हिंसाचाराच्या आरोपांसह हसन जिल्ह्यात अश्लील व्हिडिओ क्लिप प्रसारित झाल्याच्या पार्श्वभूमीवर विशेष तपास पथक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आशुतोष मसगौंडे

कर्नाटक सरकारने जनता दल सेक्युलर (जेडीएस) खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्या व्हिडिओ प्रकरणाच्या संदर्भात विशेष तपास पथक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाने नुकतेच सांगितले. कर्नाटकातील लोकसभा निवडणुकीच्या अवघ्या दोन दिवस अगोदर हे ‘अश्लील’ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

महिलांवरील लैंगिक हिंसाचाराच्या आरोपांसह हसन जिल्ह्यात अश्लील व्हिडिओ क्लिप प्रसारित झाल्याच्या पार्श्वभूमीवर विशेष तपास पथक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विशेष म्हणजे प्रज्वल रेवन्ना हे माजी पंतप्रधान एचडी देवेगोवडा यांचे नातू आहेत. (SIT In Hassan Sex Scandal)

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, सरकारने प्रज्वल रेवण्णाच्या अश्लील व्हिडिओप्रकरणी विशेष तपास पथक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

हसन जिल्ह्यात अश्लील व्हिडिओ क्लिप प्रसारित केल्या जात आहेत, ज्यामध्ये महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे दिसत आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षांनी याबाबत सरकारला पत्र लिहून एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली होती. त्यांच्या विनंतीला प्रतिसाद देत हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोण आहे प्रज्वल रेवन्ना?

प्रज्वल हा भारताचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आहे. कर्नाटकचे माजी बांधकाम मंत्री एचडी रेवन्ना यांचे ते पुत्र आहेत. तर राज्याचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी हे त्यांचे काका आहेत.

हसनमधून प्रज्वल पुन्हा निवडणूक लढवत आहे. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्याने ही जागा जिंकली होती.

काय आहे प्रकरण?

कर्नाटक राज्य महिला आयोगाने गुरुवारी, 25 एप्रिल रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून कथित लैंगिक घोटाळ्याची विशेष चौकशी करण्याची मागणी केली होती.

राज्यातील एका प्रमुख राजकारण्याचा समावेश असलेले कथित खाजगी व्हिडिओ सार्वजनिक झाल्यानंतर महिला आयोगाने हे पत्र लिहिले होते.

2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आणि राज्यातील पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी, एका प्रभावशाली कुटुंबातील राजकारण्याचे अनेक अश्लिल व्हिडिओ आणि फोटो सार्वजनिक झाले आहेत.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही तासांनंतर, पीडितांपैकी कोणीही आरोपी राजकारण्याविरुद्ध तक्रार नोंदवण्यासाठी पुढे आलेला दिसत नाही. या राजकीय नेत्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी हजारो महिलांना ब्लॅकमेल करण्यात आल्याचा महिला आयोगाच्या सदस्यांचा दावा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

FDA Crime : पुण्यातील बर्गर किंगवर एफडीएची कारवाई; अकरा हॉटेलचे परवाने निलंबित

''भारत शांततेवर विश्वास ठेवतो, पण...''; स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती मुर्मूंचं देशवासीयांना संबोधन

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

Manchar News : ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा! मंचरला ‘टॉपकॉन ट्रायटन’ मशीनद्वारे रेटिना व सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे अचूक पद्धतीने होणार परीक्षण

SCROLL FOR NEXT