bihar news
bihar news 
देश

उतावळा नवरा! लग्नाच्या दोन महिने आधीच मुलीच्या घरी गेला अन् गोंधळ घातला, पोलिसांनी थेट...

कार्तिक पुजारी

लखनौ- लग्न हा सर्वांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. जवळपास सर्वजण या क्षणाची आतुरतेने वाट पाहतात. एकदा लग्न ठरल्यानंतर ते होईपर्यंतचा काळ जोडप्यांसाठी आनंदाचा असतो. लग्न जसं जसं जवळ येईल तसं तरुण-तरुणी एक-एकदिवस मोजत असतात. पण, बिहारच्या नवादामध्ये एक वेगळा प्रकार समोर आला आहे. उतावळ्या तरुणाने लग्नाला दोन महिने शिल्लक असताना तारखेआधीच लग्न करुन टाकलं आहे.

लग्नाची तारीख दोन महिन्यांनी होती. पण, नवरा मुलगा मुलीच्या गावी पोहोचला आणि लग्नाचा हट्ट करु लागला. माहितीनुसार, सर्व प्रकार नवादाच्या मेसकौर पोलीस स्टेशन क्षेत्रातील नीमचक गावातील आहे. २५ एप्रिलला हे लग्न झालंय. पण, हा प्रकार आता उजेडात आला आहे. लग्नाला आणखी वेळ असताना दोघांनी मर्जीने लग्न करण्याचा निर्णय घेतला.

गुरुवारी तरुण आपली होणाऱ्या वधूचे गाव नीमचक येथे पोहोचला. सासरच्यांना त्यांचे लग्न लावण्याचा हट्ट करु लागला. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर सासरच्यांना नाईलाजाने पोलिसांना बोलावं लागलं, कारण प्रकरण हाताच्या बाहेर जात होतं. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. तरुण-तरुणी सज्ञान असल्याने त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं.

पोलिसांनी दोन्हीकडील कुटुंबियांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं. प्रकरण काय आहे ते नीट समजून घेतलं. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही कुटुंबांमध्ये तडजोड घडवून आणली. तसेच पोलिसांनी स्टेशनच्या पाठीमागे असलेल्या एका मंदिरामध्ये दोघांचे लग्न लावून दिले. या लग्नाची परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, कोपीन गावाचे रहिवाशी रामचंद्र यांचा २१ वर्षीय मुलगा त्रिपुरारी कुमार आणि नीमचक गावाचे सुखदेव यांची कन्या १९ वर्षीय सुमन कुमारी यांचे लग्न ठरले होते. पण, नवऱ्या मुलाने हट्ट केल्याने त्यांचे मुदतीआधीच लग्न लावून देण्यात आले आहे. दोन्ही कुटुंबाच्या मर्जीने पोलीस स्टेशन जवळच्या महादेवाच्या मंदिरात हे लग्न करण्यात आले. जोडप्याचे लग्न जुलैमध्ये होणार होतं. पण, नवरामुलगा अचानक मुलीच्या गावामध्ये पोहोचला होता. त्याने हट्ट धरल्याने लग्न लावून देण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT