suprem court sakal
देश

हेट स्पीच : मुस्लिम नेत्यांनाही अटक व्हावी; हिंदू सेना सुप्रीम कोर्टात

सकाळ डिजिटल टीम

हिंदुंच्या धार्मिक नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही हिंदू सेनेनं केला आहे.

नवी दिल्ली - हरिद्वारमध्ये झालेल्या धर्मसंसद प्रकरणी कारवाईनंतर आता हिंदू सेनेनं सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे. त्यांनी धर्म संसदेतील हेट स्पीचसाठी कारवाईविरोधात याचिका दाखल केली आहे. धर्म संसद प्रकरणी कारवाई केल्यास मुस्लिम नेत्यांनासुद्धा हेट स्पीचसाठी अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता (Vishnu Gupta) यांच्याकडून याचिका दाखल करण्यात आली आहे.

राज्य सरकारांनी असदुद्दीन ओवैसी, तौकिर रजा, साजिद रशिदी, अमानतुल्ला खान, वारिस पठाण यांच्याविरोधात हेट स्पीच प्रकरणी एफआयर दाखल करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी याचिकेत केलीय. हिंदू सेनेनं म्हटलंय की, धर्म संसद प्रकरणी याचिका दाखल केलेले पत्रकार कुर्बान अली मुस्लिम समुदायातील आहेत. त्यांनी हिंदू धर्म संसदेशी संबंधित प्रकरणात आक्षेप घेतला नाही पाहिजे. हिंदुंच्या धार्मिक नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही हिंदू सेनेनं केला आहे.

हिंदू अध्यात्मिक गुरुंकडून धर्म संसदेचं आय़ोजन कोणत्याही इतर धर्माविरोधात असं मानलं जाऊ शकत नाही. तसंच याचा विरोधही केला जाऊ नये. धार्मिक नेत्यांची वक्तव्ये ही बिगर हिंदू समाजाच्या सदस्यांकडून हिंदूंच्या संस्कृती आणि सभ्यतेविरुद्ध करण्यात आलेल्या टीकेवरील उत्तरे होती. अशा प्रकारची उत्तरे हेट स्पीच म्हणता येणार नाहीत असंही याचिकेत म्हटलं आहे.

अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी केली जात नाही तोपर्यंत या वक्तव्यांना हेट स्पीच मानता येणार नाही. भारताचे संविधन सर्व धर्मांच्या अनुयायांना समान सुरक्षा देते. देशाच्या प्रत्येक नागरिकाला विवेक, अभ्यास आणि धर्माच्या प्रचाराचं स्वातंत्र्य असल्याचं याचिकार्त्यानं म्हटलंय.

गेल्या आठवड्यात उत्तराखंड पोलिसांनी यती नरसिंहानंद आणि जितेंद्र नारायण त्यागी यांना धर्म संसदेतील हेट स्पीच प्रकरणी अटक केली होती. पत्रकार कुर्बान अली आणि पटना हायकोर्टाचे न्यायाधीश अंजना प्रकाश यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर सर्वोच्च न्यायालायने दिल्ली पोलिस आणि उत्तराखंड सरकारला नोटीस पाठवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup Final: फुल राडा... अर्जेंटिनाचे खेळाडू हाणामारीवर उतरले, स्पेनच्या खेळाडूचा गळा दाबला, एकाला उचलून आपटले Video

Fifa World Cup Awards 2026 : लिओनेल मेस्सीला ना जेतेपद मिळाले, ना Golden Boot! वर्ल्ड कप पुरस्कारांमध्ये कोणी मारली बाजी, वाचा

FIFA WORLD CUP 2026 PRIZE MONEY: ४,८१,४०,००,०००! स्पेनने विजेतेपदाच्या ट्रॉफीसह जिंकली बक्कळ रक्कम; अर्जेंटिनाला किती बक्षीस मिळाले वाचा... जाणून घ्या वर्ल्ड कप विजेत्यांची यादी

Fifa World Cup Final : स्पेन विश्वविजेता! लिओनेल मेस्सीचा अर्जेंटिना 'चारीमुंड्या चीत'; १६ वर्षांनंतर 'Tiki-Taka' ची बाजी

Fifa World Cup Final : रेफरी झोपलाय का? अर्जेंटिनासाठी वर्ल्ड कप सेट केल्याचा आरोप... दोन घटना, ज्याने फुटबॉल विश्वात संताप, Video

SCROLL FOR NEXT