central government order to private television channels to strictly follow legal programme code sakal
देश

Supreme Court of India : "अजेंडा राबवणाऱ्या वृत्तवाहिन्या समाजात फूट पाडतायत"

अशा प्रसारणांवर नियंत्रण कसं ठेवायचं? असा प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

भारतातल्या वृत्तवाहिन्यांमुळे समाजामध्ये फूट पडत असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. अशा वाहिन्या एका विशिष्ट अजेंडा राबवतात आणि त्यांना पैसे पुरवणाऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे काम करतात आणि बातम्या चालवतात, असंही कोर्टाने सांगितलं आहे.

अशा पद्धतीचे अजेंडा घेऊन चालणारे प्रसारण कसे नियंत्रित करायचे असा प्रश्न बीव्ही नागरत्न आणि केएम जोसेफ या न्यायमूर्तींच्या खंडपीठाने न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड्स ऑथोरिटी आणि केंद्र सरकारला विचारला आहे.

हेही वाचा - सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

न्यायमूर्ती जोसेफ म्हणाले, "सध्या वाहिन्या एकमेकांशी स्पर्धा करत आहेत. भावना भडकवत आहेत. याला नियंत्रित कसं करायचं? भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे महत्त्वाचं आहे. स्वातंत्र्याबद्दलचा प्रॉब्लेम असा आहे की ते प्रेक्षकांशी संबंधित आहे. प्रेक्षकांना हा अजेंडा लक्षात येत आहे का? अजेंडा इतर कोणाची तरी सेवा करत आहे. तरच त्यांना वाहिनीसाठी पैसा मिळेल. मुद्दा असा आहे की जो पैसा टाकतो, तोच हुकूम गाजवतो."

अशा वाहिन्या समाजात द्वेष पसरवत आहेत, असंही खंडपीठाने म्हटलं आहे. जेव्हा तुम्ही भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर दावा करता, तेव्हा तो तुम्हाला खरचं त्याची गरज आहे, असं वर्तनही केलं पाहिजे, असंही न्यायमूर्तींनी नमूद केलं आहे. द्वेषपूर्ण भाषणाबद्दल दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी सुरू होती, त्यावर न्यायालयाने ही टीप्पणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israeli Woman Assault : पर्यटनासाठी आलेल्या इस्रायली महिलेसह दोघींवर सामूहिक अत्याचार; दोषी ठरलेल्या तिघांना फाशी, काय आहे प्रकरण?

Fergusson College Road Clash: क्षणात पेटला वाद, पुढच्याच मिनिटाला दोन गटात मारामारी! एफसी रोडवरील थरार CCTV मध्ये कैद!

महादेव मुंडे हत्या प्रकरणात आज दोघांची नार्को टेस्ट, वाल्मिक कराडच्या घरी होते कामाला; गूढ उलगडणार?

Valentine's Day 2026: व्हॅलेंटाईनला फुलांपेक्षा कंडोमची विक्री जास्त! 'हे' शहर आघाडीवर, भारतात नवा ट्रेंड

Ahilyanagar leopard: घरात घुसला अन् बाथरूममध्ये फसला; भिंगारमधील सौरभनगर परिसरात बिबट्या अखेर जेरबंद, बिबट्या आल्याने पळापळी!

SCROLL FOR NEXT