hathras another case six year old girl tourcher by her cousin died due to injuries 
देश

हाथरसमध्ये पुन्हा बलात्काराची घटना; चिमुरडीचा मृत्यू

वृत्तसंस्था

हाथरस (उत्तर प्रदेश) : हाथरसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराने संपूर्ण देश हादरला असताना पुन्हा एक बलात्काराची घटना घडली आहे. सहा वर्षाच्या मुलीवर तिच्या मावसभावानेच बलात्कार केला असून, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत पीडितेच्या आईचे सात महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर मावशी पीडितेला आपल्या घरी राहायला घेऊन गेली होती. पीडितेच्या वडिलांनी आरोप केला आहे की, 10 दिवसांपूर्वी मावशीच्या मुलाने पीडितेवर बलात्कार केला. शिवाय, तिला बाथरूममध्ये कोंडून ठेवले. घराबाहेर खेळणाऱ्या मुलांनी पीडितेचा ओरडण्याचा आवाज ऐकला होता. चाइल्ड हेल्पलाइनच्या मदतीने मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती खालावत गेल्यामुळे पुढील उपचारासाठी दिल्लीला पाठविण्यात आले. उपचारादरम्यान पीडित मुलीचा आज (मंगळवार) मृत्यू झाला.

दरम्यान, पीडित मुलीचा मृतदेह दिल्लीहून राहत्या घरी आणत असताना पीडितेच्या कुटुंबियांनी रस्ता रोखला होता. आरोपीला शिक्षा मिळाल्यानंतरच अंत्यसंस्कार केले जातील असे कुटुंबियांचे म्हणणे होते. पोलिसांनी त्यांची समजूत काढून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. पीडितेच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर मावशी आणि तिच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील मावस भावाला अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT