hathras case tmc mp derek o brien stopped at border by up police 
देश

पोलिसांनी आमचे ब्लाउज ओढलेः ममता ठाकूर

वृत्तसंस्था

हाथरस (उत्तर प्रदेश): हाथरस प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन, ममता ठाकूर यांच्यासह इतर नेते निघाले होते. पण, पोलिसांनी आमच्यासोबत धक्काबुक्की करत आमचे ब्लाउज ओढले, असे तृणमूल काँग्रेसच्या नेता ममता ठाकुर यांनी सांगितले.

ममता ठाकुर यांनी सांगितले की, 'उत्तर प्रदेश महिला पोलिसांनी आमच्यासोबत धक्काबुक्की केली. त्यावेळी त्यांनी आमचे ब्लाउज ओढले, आमच्या खासदारांवर लाठीचार्ज केला आणि जमिनीवर पाडले. पुरूष पोलिसांनी सुद्धा आमच्यासोबत चुकीचा व्यवहार केला, हा प्रकार अत्यंत किळसवाणा होता'

हाथरस प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांना सांत्वन करण्यासाठी तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन, ममता ठाकूर यांच्यासह इतर नेते गावात निघाले होते. पण, पोलिसांनी त्यांना गावाच्या सीमेवर रोखले. यावेळी पोलिसांसोबत त्यांची बाचाबाची झाली. त्यामुळे संतापलेल्या पोलिसांनी खासदार डेरेक ओ ब्रायन यांना धक्काबुक्की करून बाहेर काढले. या धुमश्चक्रीत डेरेक ब्रायन हे जमिनीवर खाली कोसळले. महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी बाहेर ढकलले.

दरम्यान, हाथरसमध्ये निर्भयावर झालेल्या सामूहिक बलात्कार हत्या प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केल्याची घटना ताजी असताना आता तृणमूलच्या खासदारांनाही धक्काबुक्की केल्याचे समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT