UP Police
UP Police esakal
देश

पोलीस कोठडीतच RSS कार्यकर्त्याचा मृत्यू; बिसना गावात मोठा पोलीस बंदोबस्त

सकाळ डिजिटल टीम

किरकोळ वादातून रात्री बिसना गावात मोठी हाणामारी झालीय.

उत्तर प्रदेश : हाथरसमधील चंदपा कोतवाली भागातील बिसना गावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यकर्त्याचा पोलिस कोठडीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस (Police) बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. राजकुमार असं या संघ कार्यकर्त्याचं नाव आहे. राजकुमाराच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबात खळबळ उडालीय. मृत राजकुमार हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघात संयोजक म्हणून कार्यरत होता.

किरकोळ वादातून काल रात्री बिसना गावात (Bijna Village) मोठी हाणामारी झाली. या भांडणात मारहाण आणि दगडफेकीसह गोळीबारही झाला. या गोळीबाराची माहिती मिळताच, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणलं. यामध्ये मृत राजकुमार उर्फ ​​राजू याचाही समावेश होता. पोलीस कोठडीत राजूची प्रकृती खालावली. त्यानंतर पोलिसांनी त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेलं व नंतर पोलीस ठाण्यात आणलं. मात्र, सकाळी राजूची प्रकृती पुन्हा खालावली आणि जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलाय. अनेक पोलिस ठाण्यांच्या पोलिसांसह जिल्हाधिकारी रमेश रंजन, पोलिस अधीक्षक विकास वैद्य यांच्यासह जिल्ह्यातील इतर अधिकारीही पोलिस ठाण्यात पोहोचले आहेत. या घटनेत निष्काळजीपणा दाखवून पोलिस अधीक्षक विकास वैद्य यांनी प्रभारी पोलिस निरीक्षक चंदपा चतरसिंह राजौरा यांच्यासह चार पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केलंय. पोलिसांनी या घटनेच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले असून गावात सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT