Hathras Stampede Esakal
देश

Hathras Stampede: हाथरस प्रकरणातील मोठी बातमी! मुख्यमंत्री योगींकडे सोपवला 15 पानी SIT अहवाल, काय आहे त्यामध्ये?

Hathras Stampede: एसआयटीचा हा अहवाल एडीजी आग्रा आणि अलिगड आयुक्तांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आला आहे. 15 पानांच्या या सविस्तर अहवालात डीएम आणि एसपीसह सुमारे 100 लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे भोले बाबाच्या सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणाचा SIT अहवाल समोर आला आहे. यूपीचे डीजीपी प्रशांत कुमार आणि मुख्य सचिव मनोज कुमार सिंह शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 5 कालिदास मार्गावरील अधिकृत निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि हा अहवाल त्यांना सुपूर्द केला.

एसआयटीचा हा अहवाल एडीजी आग्रा आणि अलिगड आयुक्तांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आला आहे. 15 पानांच्या या सविस्तर अहवालात डीएम आणि एसपीसह सुमारे 100 लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. एसआयटी टीमने प्रशासकीय अधिकारी, कार्यक्रमाशी संबंधित लोक आणि सेवा कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आणि संपूर्ण अपघाताचे कारण आणि प्रचंड गर्दी यासंबंधी सर्व माहिती गोळा केली.

बाबांचे जबाब कसे नोंदवले जाणार, हा मोठा प्रश्न

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हाथरस डीएम एसपी व्यतिरिक्त भोले बाबाचे नावही एसआयटीच्या तपास यादीत आहे. या सर्वांचे जबाबही नोंदवले जाणार आहेत. अशा परिस्थितीत ही टीम व्यक्तिश: जाऊन भोले बाबाला भेटणार की भोले बाबाला बोलवलं जाणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आतापर्यंत पोलिसांना भोले बाबाचा कोणताही सुगावा लागू शकलेला नाही. अशा स्थितीत बाबांचा जबाब कसा नोंदवला जाणार? याबाबत कोणाकडेही ठोस माहिती नाही.

एडीजी आग्रा झोन अनुपम कुलश्रेष्ठ यांनी सांगितले की, एसआयटीचा तपास सुरू आहे. त्यात अनेकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यापुढेही अनेकांचे जबाब नोंदवले जातील. आज (शुक्रवारी) सायंकाळपर्यंत तपास पूर्ण झाल्यानंतर अहवाल सरकारला पाठवला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Updates : अंधेरी परिसरातील अनेक रस्ते जलमय, प्रशासनाकडून नागरिकांना रस्त्यावरून चालण्यास मनाई

"मला पंडितांकडे जायचंय" ज्योती चांदेकरांची ती इच्छा ऐकताच जुई निशब्द झाली; "तिला स्मशानात असं शांत झोपलेलं..."

Solapur Crime: 'सोलापुरातील आठवीत शिकणाऱ्या मुलीचे अपहरण'; तरुणाच्या भावजीचा फोननंबर घेऊन पोलिसांनी काढले लोकेशन अन्..

Mumbai Local Viral Video: मुसळधार पावसातही लोकल सुस्साट, पश्चिम रेल्वेने शेअर केला व्हिडिओ; लोक म्हणाले- हेच मुंबईचे स्पिरिट !

Pune Crime : 11 वर्षांच्या मुलीचे कपडे बदलताना फोटो काढले, ब्लॅकमेल करत ५ वर्षे अत्याचार; ४४ वर्षीय नराधमाला बेड्या

SCROLL FOR NEXT