Bhole Baba Narayani Sena Esakal
देश

Hathras Stampede: स्त्री-पुरुषांचा समावेश असलेली नारायणी सेना भोले बाबासाठी काय काय करते? वाचा, नारायण साकारचे कारनामे

Narayani Sena: या प्रकरणी एकापाठोपाठ एक नवे खुलासे होत आहेत. बाबाने स्वतःची वैयक्तिक सुरक्षा यंत्रणा तयार करून त्याचे नाव नारायणी सेना ठेवल्याचे आता समोर आले आहे.

आशुतोष मसगौंडे

हातरस येथे झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या 120 च्या पुढे गेली आहे. सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीमुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. सत्संगाचे आयोजन करणाऱ्या स्वयंभू संत भोले बाबा उर्फ ​​नारायण साकार हरी हा अजूनही फरार आहे.

मात्र, आता या प्रकरणी एकापाठोपाठ एक नवे खुलासे होत आहेत. बाबाने स्वतःची वैयक्तिक सुरक्षा यंत्रणा तयार करून त्याचे नाव नारायणी सेना ठेवल्याचे आता समोर आले आहे.

नारायणी सेना

मिळालेल्या माहितीनुसार, बाबाने आपल्या सुरक्षेसाठी पुरुष आणि महिला रक्षक नेमले आहेत. बाबाने या सुरक्षा कर्मचाऱ्यांना नारायणी सेना असे नाव दिले आहे. ही फौज बाबाच्या आश्रमापासून सत्संगाच्या ठिकाणापर्यंत सेवा करत असत. बाबांनी आपल्या सेवकांना आपल्या संरक्षणात ठेवले होते. सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी एक प्रकारचा ड्रेस कोडही तयार करण्यात आला होता.

भोले बाबाच्या सत्संगाची संपूर्ण व्यवस्था नारायणी सेनेच्या हातात असते. बाबा सत्संगाची ठिकाणी पोहचण्यापूर्वीच त्याची सेना घटनास्थळी पोहोचायची. बाबाचे अनेक शिष्य पोलिसातही आहेत. सत्संगाच्या वेळी ते रजा घेऊन येतात आणि बाबांच्या ताफ्याला घेऊन जातात. बाबांना प्रवचनस्थळी जाण्यासाठी स्वतंत्र मार्गही तयार करण्यात यायचा. या मार्गावरून फक्त बाबांचा ताफा जायचा.

दरम्यान बाबाच्या शोधात अनेक ठिकाणी पोलिसांचे छापेमारी सुरू आहे. बदाऊन, फारुखाबाद, हाथरस, अलीगढ, कासगंज, एटासह सुमारे 8 ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत.

मानव मंगल मिलन सद्भावना समागम समितीतर्फे या सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. या समितीच्या वतीने देव प्रकाश मधुकर परिषदेचे प्रभारी अध्यक्ष होते. त्याच्यासोबत महेश चंद्रा, अनार सिंग, संजू यादव, चंद्रदेव आणि रामप्रकाश इत्यादी मुख्य आयोजकांचाही समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT