Hathras stampede news in marathi esakal
देश

Hathras Stampede: हाथरस दुर्घटनेनंतर पोलिसांची मोठी कारवाई! 20 जणांना अटक, मुख्य सेवेकऱ्यांचा शोध सुरू

Hathras Stampede: उत्तर प्रदेशातील हाथरस चेंगराचेंगरीच्या घटनेत पोलिसांनी मोठी कारवाई करत 20 जणांना अटक केली आहे. पोलीस घटनेची सखोल चौकशी करत आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या भीषण दुर्घटनेमध्ये १२१ जणांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी २० जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या २० जणांची पोलीस चौकशी करत आहेत. हाथरस पोलिसांनी 7 पथके तयार केली आहेत. मुख्य सेवेदार देवप्रकाश मधुकर याचा पथके शोध घेत आहेत. योगी सरकारने या संपूर्ण प्रकरणात कठोर भूमिका घेतली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनुसार, गृह विभागाने बुधवारी संध्याकाळी उशिरा अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश, न्यायमूर्ती ब्रजेश कुमार श्रीवास्तव द्वितीय यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय चौकशी आयोगाची स्थापना केली. आयोगाचे मुख्यालय लखनौ येथे असेल. आयोगाला दोन महिन्यांत चौकशी पूर्ण करावी लागणार आहे.

निवृत्त आयएएस हेमंत राव, जे अतिरिक्त मुख्य सचिव होते, आणि डीजी प्रोसिक्युशन आणि सेवानिवृत्त आयपीएस भावेश कुमार, जे मुख्य राज्य माहिती आयुक्त होते, यांना आयोगाचे सदस्य बनवण्यात आले आहे. हाथरस येथे 2 जुलै रोजी झालेल्या दुर्घटनेची चौकशी आयोगाकडे सोपवण्यात आली आहे. आयोजकांनी परवानगी देताना घातलेल्या अटींचे पालन केले की नाही, याची चौकशी आयोग करेल. हा अपघात आहे की नियोजित कट आहे हेही आयोग तपासणार आहे.

प्रशासनाने केलेल्या व्यवस्थेची चौकशी करण्याची जबाबदारीही आयोगाला देण्यात आली आहे. भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी उपाययोजनाही आयोग सुचवणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाखो लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी अपडेट, 'या' लाभार्थी महिलांचे १५०० रुपये कामयचे बंद, 'ही' चूक नडली

T20 World Cup: मुंबईत नेपाळी प्रेक्षकांचा पुन्हा झाला हिरमोड; वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात वेस्ट इंडीजचा एकतर्फी विजय

सर्वांची लाडकी शेवंता अडकली लग्नबंधनात, अपूर्वा नेमळेकरने व्हॅलेटाईन डे दिवशी बांधली लग्नगाठ, नवरा आहे तरी कोण?

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT