देश

Hathras Stampede : २४ आश्रम, ५० गाड्यांचा ताफा अन् १०० कोटींची...; भोले बाबाकडे किती संपत्ती?

बाबा भक्तांकडून दान स्वीकारत नसला तरी त्याने मोठ्या खुबिने काही ट्रस्ट स्थापन करुन त्यावर मालमत्ता खरेदी केल्या. उत्तर प्रदेशात तर त्याने महालांप्रमाणेच आश्रम उभे केले आहेत. बाबाकडे शंभर कोटींची मालमत्ता असल्याचं सांगितलं जातंय.

संतोष कानडे

Bhole Baba Pal Property : २ जुलै रोजी हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये १२० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. भोले बाबा आणि नारायण साकार विश्व हरि या नावाने प्रसिद्ध असलेला सुरज पालच्या सत्संगामध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर जगभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

या भोले बाबाकडे एक-दोन नव्हे तर तब्बल २४ आश्रम आहेत, त्याच्याकडे शंभर कोटी रुपयांची मालमत्ता आहे. भक्त सांगतात त्याप्रमाणे बाबा एक रुपयाचंही दान घेत नाही. तरीही भक्तांचं प्रेम आणि विश्वास, यामुळे बाबा सूरज पालने देशभरात आपलं साम्राज्य विस्तारित केलं होतं.

बाबा भक्तांकडून दान स्वीकारत नसला तरी त्याने मोठ्या खुबिने काही ट्रस्ट स्थापन करुन त्यावर मालमत्ता खरेदी केल्या. उत्तर प्रदेशात तर त्याने महालांप्रमाणेच आश्रम उभे केले आहेत. बाबाकडे शंभर कोटींची मालमत्ता असल्याचं सांगितलं जातंय.

बाबाच्या संपत्तीमध्ये विशेषतः स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. जी बाबांनी तयार केलेल्या ट्रस्टद्वारे खरेदी केली आहे. देशभरात बाबाचे सुमारे २४ आश्रम असल्याचे समोर आले आहे. सूरज पाल सिंह जाटव याने 24 मे 2023 रोजी त्यांची सर्व मालमत्ता नारायण विश्व हरी ट्रस्टच्या नावावर दिली होती आणि हा ट्रस्ट फक्त बाबांचे सर्वात विश्वासू सेवक चालवतात.

सूरज पाल उर्फ ​​भोले बाबा हा स्वतःला चॅरिटीपासून दूर ठेवत असला तरी ट्रस्टच्या माध्यमातून अमाप देणग्या जमा होतात. मैनपुरी आश्रमात लावण्यात आलेला बोर्ड पाहिला तर त्यामध्ये सर्व देणगीदारांची माहिती देण्यात आली असून त्यामध्ये 10,000 ते 2.5 लाख रुपयांपर्यंत देणगी देणाऱ्यांचा उल्लेख आहे. या बाबाने स्वत:च्या नावावर मालमत्ता खरेदी करण्याऐवजी स्थानिक लोकांना विश्वस्त बनवले असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, भोले बाबाच्या सुरक्षा यंत्रणेचीही चर्चा आहे. त्याच्या आर्मीमध्ये किमान 5000 सैनिक होते. विशेष म्हणजे ही पिंक आर्मी बाबांच्या प्रत्येक सत्संगात सुरक्षेचे तीन टप्पे तयार करायची. यात बाबांचे वैयक्तिक 100 ब्लॅक कॅट कमांडो देखील सामील होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahavitran Transfers: महावितरणात ‘ऑपरेशन ट्रान्सफर’! राज्यभरातील १६ अधीक्षक अभियंत्यांच्या तडकाफडकी बदल्या; कारण काय?

Hasan Mushrif Sharad Pawar : हसन मुश्रीफांनी संपलेला विषय पुन्हा काढला, "शरद पवारांना आमदार प्रेमापोटी भेटले असतील"; संजय शिरसाठांवरही केलं भाष्य

SRH vs RCB : हेनरिच क्लासनचा मोठा पराक्रम! अभिषेक, इशानसह आतषबाजी; उभारली IPL 2026 मधील दुसरी सर्वोच्च धावसंख्या

NEET Paper Leak Pune: ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील मुख्याध्यापिका मनीषा हवालदार निलंबित; सीबीआयची कारवाई

India Pakistan Border Security : पाकिस्तान, बांगलादेश सीमेवर ६ हजार किमीची भींत, शत्रुला रोखण्यासाठी गृहमंत्री अमित शाहांकडून नव्या प्रकल्पाची घोषणा

SCROLL FOR NEXT