Hathras stampede Esakal
देश

Hathras stampede: सातारा ते जोधपूर... देशातील अशा घटना जिथे चेंगराचेंगरीमुळे गमावले शेकडो भाविकांनी प्राण

Mandhardevi Accident 2005: भारतातील मंदिरे आणि इतर धार्मिक कार्यक्रमांदरम्यान चेंगराचेंगरीमुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होण्याची ही पहिली घटना नाही.

आशुतोष मसगौंडे

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे आयोजित सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे 120 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

भारतातील मंदिरे आणि इतर धार्मिक कार्यक्रमांदरम्यान चेंगराचेंगरीमुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होण्याची ही पहिली घटना नाही.

2005 मध्ये महाराष्ट्रातील मांढरदेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 340 भाविकांचा आणि 2008 मध्ये राजस्थानमधील जोधपूरमध्ये चामुंडा देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान 250 जणांचा मृत्यू झाला होता.

2008 मध्ये हिमाचल प्रदेशातील नैना देवी मंदिरात धार्मिक कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 162 जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

गेल्या काही वर्षांत देशातील मंदिरे आणि धार्मिक कार्यक्रमांदरम्यान चेंगराचेंगरीच्या काही प्रमुख घटना खालीलप्रमाणे आहेत.

सातारा, 25 जानेवारी 2005

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याजवळील मांढरदेवी मंदिरात चेंगराचेंगरी झाल्यामुळे 25 जानेवारी 2005 रोजी 340 हून अधिक भाविकांचा मृत्यू झाला होता. भाविक नारळ फोडण्यासाठी पायऱ्या चढत असताना हा अपघात झाला. त्यामध्ये पायऱ्या चढत असलेले काही भाविक घसरून पायऱ्यांवरून खाली पडले आणि त्यामुळे चेंगराचेंगरी झाली.

बिलासपूर 3 ऑगस्ट 2008

दर वर्षी श्रावण महिन्यात, हिमाचल प्रदेशातील नैना देवी मंदिरात देवी मातेच्या दर्शनासाठी हजारो भाविक जमतात.

2008 सालीही देवीच्या दर्शनासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, 3 ऑगस्ट रोजी पावसामुळे मंदिरात दरड कोसळल्याने चेंगराचेंगरी झाली होती. या गोंधळात 146 जणांना आपला जीव गमवावा लागला.

जोधपूर 3 सप्टेंबर 2008:

नैना देवी मंदिर दुर्घटनेतून देशवासी सावरत असतानाच पुढच्याच महिन्यात राजस्थानमधील चामुंडा देवी मंदिरात 224 जणांचा मृत्यू झाला.

वास्तविक, शारदीय नवरात्रीमध्ये भाविकांची मोठी गर्दी होते. नवरात्रोत्सवात देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांमध्ये झुंबड उडाली होती. यानंतर चेंगराचेंगरी झाली. दरम्यान, काही लोकांनी स्फोट झाल्याची अफवाही पसरवली होती.

पुलमेडू 14 जानेवारी 2011:

मकर संक्रांतीच्या सणाला, केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील पुलमेडू येथील सबरीमाला मंदिरात लाखो भाविक जमले होते. त्यावेळी भाविकांनी भरलेली जीप गर्दीत शिरली आणि उलटली, त्यामुळे अनेकांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 109 जणांचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT