हाथरस येथे संत्सगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे शंभराहून अधिक मृत्यू पडले आहेत. यापूर्वीही धार्मिक ठिकाणी चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या. विशेष म्हणजे २००८ ते २०१३ या पाच वर्षाच्या चेंगराचेंगरीच्या २९ घटनांपैकी २७ घटना धार्मिक स्थळाजवळ घडल्या. त्यात एकूण ५०० हून अधिक मृत्युमुखी पडले तर शेकडो जण जखमी झाल्याची माहिती गृहमंत्रालयाने दिली होती. महाराष्ट्रातील मांढरदेवी आणि राजस्थानच्या चामुंडादेवी मंदिर परिसरातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडणाऱ्या भाविकांची संख्या आतापर्यंतच्या घटनांतील सर्वाधिक राहिली आहे.
काही महत्त्वाच्या घटना
२७ ऑगस्ट २००३ : नाशिक येथे कुंभमेळ्यादरम्यान ३९ जणांचा मृत्यू तर १४० जण जखमी झाले.
२५ जानेवारी २००५ : महाराष्ट्रातील मांढरदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी होऊन ३४० भाविकांचा मृत्यू झाला होता.
३ ऑगस्ट २००८ : हिमाचल प्रदेशात नैना देवी मंदिर येथे पादचाऱ्यांसाठी उभारलेले शेड कोसळल्याने झालेल्या पळापळीमुळे
१६२ जणांचा मृत्यू झाला. १२ हून अधिक जखमी झाले.
३० सप्टेंबर २००८ : जोधपूर येथील मेहरानगड येथील चामुंडादेवी मंदिर परिसरात चेंगराचेगरी होऊन २२० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला.
४ मार्च २०१० : उत्तर प्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यातील रामजानकी मंदिराजवळ चेंगराचेंगरी होऊन ६३ जणांचा मृत्यू झाला. मोफत कपडे आणि भोजन घेण्यासाठी एकच गर्दी उसळली.
१४ जानेवारी २०११: केरळच्या इडुक्की जिल्ह्यात पुलमेदू येथे शबरीमला मंदिराच्या दर्शनासाठी जमलेल्या भाविकांत चेंगराचेंगरी झाल्याने १०४ जणांचा मृत्यू झाला आणि शंभरपेक्षा अधिक जखमी झाले.
८ नोव्हेंबर २०११ : हरिद्वार येथील हर की पौडी येथे चेंगराचेंगरीत
२० जणांचा मृत्यू.
२५ सप्टेंबर २०१२ : झारखंडच्या देवघर येथे ठाकूर अनुकूल चंद यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त एका आश्रमाच्या परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीत गुदमरून १२ जणांचा मृत्यू झाला.
१९ नोव्हेंबर २०१२ : पाटण्यातील अदालत घाट येथे छट पूजेच्या वेळी चेंगराचेंगरी होऊन २० जणांचा मृत्यू झाला.
२०१३ : अलाहाबाद येथे कुंभमेळ्यासाठी जमलेल्या भाविकांची रेल्वे स्थानकावर अचानक धावपळ उडाली आणि त्यात चेंगराचेंगरी होऊन ३९ जणांचा मृत्यू झाला.
१३ ऑक्टोबर २०१३ : नवरात्रीच्या काळात मध्य प्रदेशातील दातिया येथील रत्नगड मंदिर परिसरात चेंगराचेंगरी होऊन किमान ११५ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेत अनेक जण जखमी झाले. मंदिराजवळील पुलावर चेंगराचेंगरी झाली होती.
२५ ऑगस्ट २०१४ : मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील चित्रकूट येथे कामतनाथ मंदिरात चेंगराचेंगरी होऊन दहा जणांचा मृत्यू झाला आणि ६० जण जखमी झाले.
३ ऑक्टोबर २०१४ : पाटण्यातील गांधी मैदान येथील दसरा उत्सवादरम्यान चेंगराचेंगरी होऊन ३२ जणांचा मृत्यू झाला.
१४ जुलै २०१५ : आंध्र प्रदेशच्या राजमुंद्री येथे पुष्करम उत्सवादरम्यान गोदावरीच्या काठावर जमलेल्या भाविकांत चेंगराचेंगरी होऊन २७ जणांचा मृत्यू झाला. २० जण जखमी झाले होते.
१ जानेवारी २०२२ : जम्मू काश्मीरमधील माता वैष्णोदेवी भवन येथे
१ जानेवारी २०२२ च्या पहाटे अडीच वाजता झालेल्या चेंगराचेंगरीत १२ जणांचा मृत्यू झाला होता आणि २० जण जखमी झाले होते.
३१ मार्च २०२३ : इंदोर शहरात रामनवमीनिमित्त आयोजित होम हवनच्या कार्यक्रमादरम्यान प्राचीन बावडीवरचा स्लॅब अचानक कोसळल्याने ३६ जणांचा मृत्यू झाला होता.
नातेवाईक बेपत्ता झाल्याने भयभीत
आग्रा येथून भोलेबाबा यांचा सत्संग यांचा ऐकण्यासाठी आलेल्या एका महिलेची पंधरा वर्षाची मुलगी बेपत्ता झाली. पोलिसांकडूनही कोणतीही माहिती दिली जात नसल्याचे पीडित महिलेने माध्यमांना सांगितले. रुग्णालय आणि घटनास्थळी देखील मुलगी दिसत नसल्याने तिची आई भयभीत झाली.
तसेच बदायूँ येथील सुरेश हा सत्संगासाठी आपल्या कुटुंबीयांसह आला होता. मात्र चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर भावाची सून सापडत नसल्याचे सुरेश याने सांगितले. या चेंगराचेंगरीमुळे अनेक जण बेपत्ता असल्याचे पोलिसांनी आम्हाला सांगितले असून आम्ही त्यांचा शोध घेत असल्याचे सुरेश म्हणाले. दरम्यान, रस्ता खराब असल्याने चेंगराचेंगरी झाल्याचे प्रत्यक्षदर्शी शकुंतला नावाच्या महिलेने सांगितले. भोलेबाबा यांचा सत्संग सुरू होता. तो संपताच नागरिक तेथून बाहेर पडण्यासाठी घाई करू लागले. मात्र रस्ता चांगला नसल्याने नागरिकांना चालता येत नव्हते आणि त्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि एकच गोंधळ उडाला.
तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
हाथरस येथील फुलरई गावात झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी नवीन माहिती समोर येत आहे. येथे आयोजित असलेल्या सत्संगासाठी राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाना यांसह अनेक राज्यातून भाविक आले होते. येथे एवढ्या मोठ्याप्रमाणात भाविक जमले होते की त्यांच्या वाहनांची रांग सुमारे तीन किलोमीटरपर्यंत होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.