HC Judge Abhijit Gangopadhyay Resigns to Join BJP Sakal
देश

Abhijit Gangopadhyay : माजी न्यायाधीशांना भाजपची साथ; गंगोपाध्याय यांचा पदाचा राजीनामा

कोलकता उच्च न्यायालयातील न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय यांनी मंगळवारी पदाचा राजीनामा दिला.

सकाळ वृत्तसेवा

कोलकता : कोलकता उच्च न्यायालयातील न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय यांनी मंगळवारी पदाचा राजीनामा दिला. भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा मनोदय त्यांनी राजीनाम्यानंतर जाहीर केला. यामुळे गंगोपाध्याय विधी सेवेतून राजकारणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पत्रकार परिषदेत आज त्यांनी तृणमूल काँग्रेस पक्षावर टीका केली. ‘‘भ्रष्टाचाराचा समानार्थी शब्द ‘तृणमूल काँग्रेस’ आहे आणि त्याविरोधात मी शेवटपर्यंत लढेन. मी ७ मार्चला भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.

भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि बंगालमधील ‘तृणमूल’च्या भ्रष्टाचाराविरुद्ध तो लढत असल्याने मी भाजपमध्ये सहभागी होत आहे,’’ असे ते म्हणाले. राजकीय प्रवेशाबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिले असले तरी लोकसभा निवडणूक लढवणार की नाही यावर थेट उत्तर देण्याचे टाळले.

‘‘मी निवडणूक लढवावी की नाही हे भाजप नेतृत्व ठरवेल. ते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. ‘तृणमूल’च्या अन्याय आणि भ्रष्टाचाराविरोधात लढणार,’’ असे गंगोपाध्याय यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘‘२००९ च्या लोकसभा निवडणुकीत ‘माकप’च्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीचा पराभव झाला. याचा परिण्याबाबत ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपूर्वी मी हा निर्णय घेतला. ‘तृणमूल’विरुद्ध लढण्यासाठी हेच योग्य व्यासपीठ आहे असे वाटले. सुवेंदू अधिकारी यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांबद्दल विचारले असता, ते म्हणाले, की त्यांना व इतर नेत्यांना अडकविण्यासाठी शिजवलेला हा कट आहे.

सहा वर्षांचा सेवाकाळ

गंगोपाध्याय यांनी त्यांचे राजीनामा पत्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठविले आहे. तसेच त्याच्या प्रती सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि कोलकता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश टी.एस. शिवगनम यांना सकाळी पाठवल्या.गंगोपाध्याय हे २ मे २०१८ रोजी कोलकता उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून रुजू झाले होते. ३० जुलै २०२० रोजी त्यांची कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT