Indian employees sakal
देश

भारतात कर्मचाऱ्यांचे आरोग्य उत्तम! जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान; जपान तळात

बहुतेक प्रौढांसाठी, त्यांच्या आयुष्याचा बहुतेक वेळ कामाच्या ठिकाणीच घालवला जातो.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण आरोग्यासंदर्भातील जागतिक क्रमवारीत भारत दुसऱ्या स्थानी आहे. अमेरिकेतील मॅकिन्से हेल्थ इन्स्टिट्यूटने हे सर्वेक्षण केले आहे. यामध्ये देशांमधील ३० हजार कर्मचाऱ्यांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक आरोग्याचे विश्‍लेषण करण्यात आले आहे.

१ संस्थेने हा पाहणी अहवाल गुरुवारी (ता.२) प्रसिद्ध केला. सर्वेक्षणात भाग घेतलेल्या ३० देशांमध्ये तुर्किये सर्वोच्च स्थानी आहे. त्यानंतर भारताचा क्रमांक असून जपान सर्वांत तळात आहे. लहान कंपन्यांच्या तुलनेत उच्च मोठ्या कंपन्यांमध्ये (२५० पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या) आरोग्यदायी वातावरण असल्याचे पाहणीत आढळून आले.

२ इतर कर्मचाऱ्यांपेक्षा व्‍यवस्थापकपदावरील अधिकाऱ्यांचे आरोग्य सर्वांत उत्तम असल्याचे अहवालात नमूद केले आहे. सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुदृढ असून ते कामात अधिक नावीन्यता दाखवतात आणि ते अधिक चांगल्या पद्धतीने काम करतात, असे ‘मॅकिन्से’ने म्हटले आहे.

३ बहुतेक प्रौढांसाठी, त्यांच्या आयुष्याचा बहुतेक वेळ कामाच्या ठिकाणीच घालवला जातो. यामुळे कर्मचाऱ्यांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक आरोग्य समृद्ध करण्यासाठी मालकांनी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे, असे या अहवालात लेखकांनी म्हटले आहे.

आरोग्यदायी कर्मचारी (टक्केवारी)

जपान २५%

७५%चीन

७६%भारत

७८%तुर्किये

५७%जागतिक सरासरी

(स्रोत मॅकिन्से हेल्थ इन्स्टिट्यूट) ब्लूमबर्ग)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT