cancer diabetes esakal
देश

कॅन्सर व मधुमेही रुग्णांसाठी केंद्र सरकारकडून Good News!

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशभर पसरलेली कोरोना विषाणूची दुसरी लाट (Corona Second Wave) आता आटोक्यात येत असल्याचं चित्र आहे. लसीकरणाचं प्रमाणही वेगाने वाढत आहे. दरम्यान कॅन्सर (cancer) आणि मधुमेहासारख्या (Diabetes) गंभीर आजारांच्या रुग्णांसाठी केंद्र सरकारने खुशखबर दिली आहे. सामान्य माणसाला परवडणारी आणि सहज उपलब्ध असणारी आरोग्य यंत्रणा देशभरात उभी करण्याचं सरकारचं लक्ष्य असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया (dr mansukh mandvia) यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

छोट्या रुग्णालयांत देखील मिळणार उपचार

पंतप्रधान जनआरोग्य योजनेअंतर्गत आतापर्यंत 2.31 कोटी नागरिकांवर उपचार करण्यात आले आहेत. . हेल्थ इन्फ्रास्टक्चर मिशन अंतर्गत देशातील 602 जिल्ह्यांमध्ये क्रिटिकल केअर हॉस्पिटल ब्लॉकची स्थापना करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणं राज्य स्तरावर कमीत कमी 15 हेल्थ इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.देशभरात पायाभूत सुविधांवर काम सुरू असल्याची माहिती मंडाविया यांनी दिली आहे. इन्फ्रास्टक्चरवर प्रत्येक जिल्ह्यात 90 ते 100 कोटी रुपये खर्च करण्यात येत असून पुढील 4 ते 5 वर्षात हा खर्च करण्यात येणार आहे.

गंभीर आजारांवर उपचार मिळणं शक्य

आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत सर्वत्र वेलनेस सेंटर्सची स्थापना केली जाणार आहे. यामुळे छोट्या रुग्णालयांमध्ये देखील नागरिकांना कॅन्सर आणि मधुमेहासारख्या गंभीर आजारांवर उपचार मिळणं शक्य होणार आहे. केंद्र सरकार देशभरात 1.5 लाख वेलनेस केंद्रं सुरू करण्याच्या विचारात असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी दिली आहे. या प्रस्तावित दीड लाख केंद्रांपैकी 79 हजार केंद्रांची अगोदरच उभारणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Namo Tourism Centre Controversy : राज ठाकरेंचा 'नमो टुरिझम सेंटर' तोडण्याचा इशारा, शिंदे गटानं दिलं चोख प्रत्युत्तर; नेमकं काय म्हणाले?

Inside Story Maharashtra Farmers : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची बंद दाराआड काय घडली चर्चा, राजू शेट्टींनी सांगितली इनसाईड स्टोरी...

Latest Marathi News Live Update : खोट्या मतदार यादीविरोधात ठाकरे गटाचा उद्या मुंबईत मोर्चा

MPSC Result 2024: राज्यसेवा परीक्षा निकाल जाहीर! सोलापूरचा विजय लामकणे राज्यात पहिला

Suhas Shetty Case : बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येमागे PFI चा कट उघड, NIA चा धक्कादायक अहवाल, 11 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

SCROLL FOR NEXT