Vaccine Sakal
देश

आरोग्यमंत्री बदलताच लशींचा पुरवठा मंदावला

जुलैत १७.८ कोटी डोस राज्यांना दिले जातील असे याआधी सांगणाऱ्या केंद्राने आता या महिन्यात १३.५ कोटी लसीच उपलब्ध होतील, अशी कोलांटउडी मारली.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - येत्या डिसेंबरपर्यंत देशातील सर्व नागरिकांचे कोरोना लसीकरण (Corona Vaccination) पूर्ण करण्याचा विडा उचलणाऱ्या केंद्र सरकारने (Central Government) डिसेंबर २०२१ पर्यंत २२५ कोटी डोस उपलब्ध होतील असा दावा सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) केला होता. प्रत्यक्षात केंद्रातील आरोग्यमंत्री बदलताच लशींच्या पुरवठ्याचे गणित व त्याचा आलेख घसरताना दिसत आहे. जुलैत १७.८ कोटी डोस राज्यांना दिले जातील असे याआधी सांगणाऱ्या केंद्राने आता या महिन्यात १३.५ कोटी लसीच उपलब्ध होतील, अशी कोलांटउडी मारली आहे. सहाजिकच देशातील दैनंदिन लसीकरणाचा आकडाही जेमतेम ४४ लाखांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. (Health Minister Changed Supply of Vaccines Slowed Down pjp78)

मंत्रिमंडळातील फेरबदलांमध्ये डॉ. हर्षवर्धन यांना आरोग्यमंत्रिपद गमवावे लागले व मंडाविया यांच्याकडे हे पद आले. त्यानंतर लसीकरणाच्या पुरवठ्याबाबत आता मिळालेल्या माहितीनुसार प्रतिकूल कल दिसत आहे. कोव्हिशिल्ड वगळता इतर दोन्ही लशींचे उत्पादन घटणार आहे. केंद्राने सर्वोच्च न्यायालयातील प्रतिज्ञापत्रानुसार जुलैत कोव्हॅक्सिनचे उत्पादन २ कोटींहून साडेसात कोटींवर जाईल, असा दावा केला. त्याच धर्तीवर कोव्हिशिल्डचे साडेसात कोटी व स्पुटनिकचे २.८ कोटी डोस या महिन्यात मिळतील असे सांगण्यात आले होते. केंद्राने पूरक प्रतिज्ञापत्र सादर केले त्यात पुरवठा लक्षणीयरीत्या कमी असेल असे म्हटले.

कोव्हॅक्सिनचे साडेसात कोटी नव्हे तर २ कोटी डोसच या महिन्यात मिळतील, असे त्यात म्हटले आहे. जुलैत राज्यांना १३ कोटी ५० लाख डोस दिले जातील असे मंडाविया यांनी आता जाहीर केले आहे. मंडाविया यांनी काल दिलेली माहिती पाहता या महिन्यात राज्यांना मिळणाऱ्या डोसची संख्या १३ कोटी ५० पर्यंत खाली आली आहे. ही संख्या आधार मानली तर रोजच्या लसीकरणाची सरासरी जेमतेम ४४ लाखापर्यंतच जाते.

लसीकरणात ४१ टक्के घट

जागतिक योगदिनी (२१ जून) देशाने ८५ लाख लसीकरणाचा विश्वविक्रम केल्यावर थॅंक यू मोदी जी असे फलक जागोजागी दिसू लागले. मात्र २६ जूनला हा आकडा ६४ लाख ८० हजारांवर आला. १३ जुलैला तो ३७ लाख ६८ हजार पर्यंत घसरला. २१ जूनच्या विक्रमी लसीकरणाच्या तुलनेत ही घट ४१.४ टक्के होती. महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली, राजस्थानसह अनेक राज्यांत लशींचा दुष्काळ पडला असून लोकांना लसीकरण केंद्रांवर तासनतास उभे राहिल्यावरही रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. मंडाविया यांनी मात्र या तक्रारी फेटाळताना राज्य सरकारांच्या गैरव्यवस्थापनानेच ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT