mansukh mandviya
mansukh mandviya sakal
देश

XE Variant : मॉनिटरिंग अन् सर्विलंन्स सिस्टम मजबूत करा; मांडवियांच्या सूचना

निनाद कुलकर्णी

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचे रुग्ण कमी होत असले, तरी गेल्या काही दिवसांपासून काही दोन राज्यात आढळलेल्या कोरोनाच्या XE व्हेरिएंटमुळे (Corona New Variant) केंद्र सरकारची चिंता वाढवली आहे. त्यानंतर आज याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कोरोनाच्या XE व्हेरिएंटबाबत सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डीआर व्हीके पॉल आणि आयसीएमआरचे महासंचालक आदी उपस्थित होते. बैठकीत मांडविया यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना देशभरातील बूस्टर ड्राइव्हला गती देण्यास सांगितले आहे. ( Review Meeting On Corona virus XE Variant )

याबाबत डॉ. मनसुख मांडविया यांनी ट्वीट केले की, कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रूग्ण आढळून आल्यानंतर 'मॉनिटरिंग आणि सर्विलंन्स सिस्टम' मजबूत करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, नव्या व्हेरिएंटच्या रूग्णांवर आणि त्यावरील लक्षणांवर निगराणी वाढवण्याच्या सूचनादेखील अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे म्हटले आहे.

काळजी करण्याची गरज नाही

नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप (NTAGI) चे प्रमुख डॉ. एनके अरोडा यांनी नवीन व्हेरियंटबद्दल बोलताना सांगितले की, नव्याने आढळून येणाऱ्या व्हेरिएंटच्या आढळून येणाऱ्या रूग्णांमुळे नागरिकांनी लगेच घाबरुन जाऊ नये. कोरोना नवनवीन व्हेरिएंट निर्माण करत असून, यामध्ये XE आणि XE मालिकेतील इतर व्हेरिएंटच्या उपप्रकारांचा समावेश असल्याचे ते म्हणाले. परंतु, हे सर्व व्हेरिएंटची लागण होणाऱ्या रूग्णांमध्ये कोणतेही गंभीर लक्षणे आढळून आलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये. सध्या देशात संसर्गाचे प्रमाणही फार वेगाने वाढत नसल्याचे ते म्हणाले.

कोरोनाच्या XE व्हेरिएंटला घाबण्याचे कारण नाही

देशातील कोरोना रूग्ण (Corona Cases In India) कमी झाल्यानंतर राज्यसह देशातील जवळपास सर्व कोरोना निर्बंध मागे घेण्यात आले आहे. त्यानंतर. काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये कोरोनाचा नवीन (COrona New Variant) व्हेरिएंट XE चे रूग्ण आढळून आले आहेत. मात्र, कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटला नागरिकांनी घाबरण्याची गरज नसल्याची दिलासादायक माहिती नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनचे प्रमुख (NTAGI) एन. के. अरोरो यांनी दिली आहे. सध्याच्या घडली भारतात आढळून येत असलेल्या रूग्णसंख्येच्या आकडेवारीनुसार तो वेगाने पसरत असल्याचे दिसून येत असल्याचेही त्यांनी सांगितले. (NTAGI Chief On XE Variant Of Covid)

मुंबईत आढळला कोरानाचा XE रूग्ण; BMC ची माहिती

मुंबईत नुकता कोरोना व्हायरसच्या XE प्रकाराच्या व्हेरिएंटची (Corona XE Variant) लागण झालेल्या रूग्णांची पुष्टी झाल्याची नोंद झाली आहे, अशी माहिती बीएमसीने (BMC) दिली आहे. सांताक्रूझ (SantaCruz) उपनगरातील रहिवासी असलेल्या 67 वर्षीय आणि पूर्ण लसीकरण झालेल्या पुरुषाला याची लागण झाल्याचे सांगण्यात आले आहे. दिलासादायक बाब म्हणजे या व्यक्तीचे संपूर्ण लसीकरण (Corona Vaccination) झालेले असून, त्याला कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षण दिसून येत नसून संबंधित व्यक्ती पूर्णपणे स्थिर असल्याचे बीएमसीने सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: संजू सॅमसनचे दमदार अर्धशतक, राजस्थानच्या १०० धावाही पार

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT