Pregnant Women  File Photo
देश

गुडन्यूज! आता गर्भवती महिलानांही घेता येईल कोरोनाची लस

आता गर्भवती महिला CoWIN अ‍ॅपवर नाव नोंदणी करुन किंवा थेट कोरोना लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतात.

सुशांत जाधव

नवी दिल्ली: गर्भवती महिलांना देखील आता कोरोनाची लस घेता येणार आहे. नॅशनल टेक्निकल अ‍ॅडवायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (NTAGI) यांनी यासंदर्भात प्रस्ताव दिला होता. त्यांच्या या प्रस्तावाला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंजुरी दिलीये. त्यामुळे आता गर्भवती महिला CoWIN अ‍ॅपवर नाव नोंदणी करुन किंवा थेट कोरोना लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतात. (Health Ministry allows Covid-19 vaccination for pregnant women)

कोरोनाचा अन्य महिलांच्या तुलनेत गर्भवती महिलांना अधिक धोका असल्याचे एका अभ्यासातून समोर आले होते. प्रीमॅच्युर बेबी म्हणजेच प्रसूतीचे पूर्ण दिवस भरण्यापूर्वी बाळ जन्माला येण्याचाही धोका असल्याचे अभ्यासातून समोर आले होते. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आता गर्भवती महिला गर्भावस्थेतील कोणत्याही टप्प्यात कोरोनाची लस घेऊ शकतात.

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) च्या एका अभ्यासानुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गर्भवती महिला आणि नुकतेच बाळाला जन्म देणाऱ्या महिलांवर कोरोनाचा अधिक परिणाम झालाय. पहिल्या लाटेच्या तुलनेत यावेळी गंभीर लक्षण असणारी रुग्ण संख्या आणि मृत्यदर ही अधिक आहे.

या अभ्यासाद्वारे गर्भवती महिला आणि नुकतेच बाळाला जन्म देणाऱ्या महिलांसदर्भात पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील तुलना करण्यात आली होती. दुसऱ्या लाटेत अशा महिलांमध्ये 28.7 टक्के गंभीर लक्षणं दिसून आली. पहिल्या लाटेवेळी ही टक्केवारी 14.2 इतकी होती. कोरोना बाधितांची टक्केवारी ही दुप्पट असून मृत्यू दरही यावेळी वाढला आहे. पहिल्या लाटेत 0.7 असणारा मृत्यू दर दुसऱ्या लाटेत 5.7 इतका नोंदवला गेलाय. या अभ्यासात एकूण 1530 गर्भवती आणि नुकतेच बाळाला जन्म देणाऱ्या महिलांचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT