Dr VK Paul. 
देश

तिसऱ्या लाटेची तारीख ठरवणं योग्य नाही; व्ही के पॉल यांनी केलं स्पष्ट

विनायक होगाडे

नवी दिल्ली : कोरोना महासाथीची दुसरी लाट अद्याप संपुष्टात आलेली नाहीये तोवरच आता तिसऱ्या लाटेची चर्चा सुरु झाली आहे. अनेक संशोधकांनी तसेच तज्ज्ञांनी ही तिसरी लाट कधी येणार, या लाटेचा महिना कोणता असणार यासंदर्भातील माहिती दिली आहे. मात्र, यासंदर्भातच आता नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉक्टर वीके पॉल यांनी म्हटलंय की, अशा प्रकारच्या कोणत्याही लाटेची तारीख अथवा महिना ठरवणं योग्य नाहीये.

त्यांनी म्हटलंय की, कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचा लसीच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होत नाहीत, असा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाहीये. याशिवाय डॉक्टर वीके पॉलने पुढे म्हटलंय की, कोवॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेची आपत्कालीन मंजूरी प्राप्त करण्यासाठीची प्रक्रिया अत्यंत जलदगतीने सुरु आहे. तसेच आशा आहे की, याबाबतचा निर्णय लवकरच होईल.

देशात ब्लॅक फंगसचे 41 हजारच्या आसपास प्रकरणे

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी म्हटलं की, भारतात आतापर्यंत ब्लॅक फंगसचे 40,845 प्रकरणे समोर आली आहेत. तसेच यामुळे मृत पावणाऱ्यांची संख्या 3,129 आहे.

जगात सर्वाधिक लस देणारा देश 'भारत'

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, भारतात आतापर्यंत 32,36,63,297 लसीचे डोस दिले गेले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लस देणाऱ्या देशांमध्ये भारत अग्रस्थानी आहे. ग्लोबल व्हॅक्सिनेशन ट्रॅकरच्या या लिस्टमध्ये भारतानंतर अमेरिकेचा नंबर लागतो. तिथे 32.33 कोटी लस दिल्या गेल्या आहेत. अमेरिकेनंतर ब्रिटनचं स्थान आहे. त्याठिकाणी 7.67 कोटी लसीचे डोस दिले गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT