health news India on to malaria eradication Malaria No More report  sakal
देश

भारत मलेरियामुक्तीच्या वाटेवर; मृत्यू ७९ टक्क्यांनी घटले

रुग्ण ८६ टक्के तर मृत्यू ७९ टक्क्यांनी कमी झाले

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशात मलेरियाच्या रुग्णांत गेल्या काही वर्षांपासून घट होत आहे. २०१५ पासून मलेरियाच्या रुग्णांत ८६ टक्क्यांनी तर २०१५ ते २०२१ दरम्यान मृत्युमध्ये ७९ टक्के घट झाल्याची माहिती ‘मलेरिया नो मोअर’ या स्वयंसेवी संस्थेच्या अहवालात देण्यात आली आहे. संस्थेने ‘भारत मलेरिया निर्मूलनाच्या दिशेने’ या नावाने हा अहवाल प्रकाशित केला. भारताने २०१७ ते २०१९ दरम्यान मलेरियाविरुद्धच्या लढ्यासाठी अर्थसंकल्पात निधीची दुप्पट तरतूद केली. त्याचप्रमाणे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत मलेरियाला दखल घेण्यासारखा आजार म्हणून घोषित करण्यात आले. त्याचप्रमाणे, दीर्घकाळ टिकणाऱ्या नऊ कोटी मच्छरदाण्या पुरविण्यात आल्या. भारताने २०३० पर्यंत मलेरियाचे निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे या अहवालात नमूद केले आहे. मात्र, खासगी क्षेत्राचा अपुरा सहभाग, वैयक्तिक व समुदाय स्तरावर एकत्र न लढणे, आदी प्रमुख आव्हाने असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

‘मलेरिया नो मोअर’च्या मुख्य तांत्रिक संचालक किर्ती मिश्रा म्हणाल्या,की गेल्या काही दिवसांत मलेरियाविरुद्धच्या लढ्यात भारताने मोठी प्रगती केली आहे. मात्र, मलेरियाचा पुन्हा डोके वर काढण्याचा इतिहास आहे. प्रसारमाध्यमांतून जागृती, मोहिमेतील उणिवा दूर करण्यातून भारत मलेरिया निर्मूलनाचे ध्येय गाठू शकतो.

भारतात मलेरिया हा गरिबांचा आजार समजला जातो. त्यामुळे, सार्वजनिक आरोग्यात मलेरियाला कमी प्राधान्य मिळाले आहे. अजूनही सरकारने मलेरियाकडे आणखी लक्ष देण्याची गरज आहे. मात्र, मलेरिया निर्मूलनाचे ध्येय केवळ सरकारमुळे गाठता येणार नाही. त्यासाठी, समाजाच्या सर्व स्तरांतून सक्रिय सहभाग आवश्यक आहे.

- प्रतिक कुमार, संचालक, ‘मलेरिया नो मोअर’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT