corona patient 
देश

कोरोना पेशंटला घेऊन आरोग्य कर्मचारी गेले उसाचा रस प्यायला; VIDEO VIRAL

सकाळ डिजिटल टीम

भोपाळ - देशात कोरोनाचा कहर सुरु असून काही राज्यांमध्ये नाइट कर्फ्यू लावण्यात आला आहे. तसंच अनेक ठिकाणी वीकेंड लॉकडाऊनही केलं आहे. तरीही नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगचं पालन होताना दिसत नाही. नागरिक कोरोना नियमावलीचं उल्लंघन करताना दिसता. मास्क, सॅनिटायझर यांचा वापरही करत नसल्याचं दिसतंय. आता असाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला नेणाऱी रुग्णवाहिका चक्क उसाच्या रसाच्या गाड्यावर थांबल्याची पहायला मिळते. यातही पीपीई सुट घातलेला कर्मचारी मास्क न घालता अॅम्ब्युलन्समधून बाहेर येऊन रसाचा ग्लास घेण्यासाठी वाट पाहत असल्याचं दिसतं. 

मध्य प्रदेशातील भोपाळमधला हा व्हिडीओ असून आरोग्य कर्मचारी कोरोनाबाधित रुग्णाला घेऊन शहारतून फिरताना दिसत आहेत. एवढंच नाही तर कोरोना बाधिताला घेऊन चक्क उसाचा रस पिण्यासाठी रसवंती गृहात पोहोचले. त्यावेळी तिथं असलेल्या एकाने या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ शूट केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आरोग्य कर्मचाऱी बराच वेळ उसाचा रस पिण्यासाठी थांबले होते. त्यावेळी गाडीमध्ये कोरोना बाधित रुग्ण अस्वस्थ अवस्थेत असल्याचंही दिसतं.

एका कोरोनाबाधित रुग्णाला आपण नेत आहोत याचाच विसर आरोग्य कर्मचाऱ्यांना पडलाय का आणि याचं काही गांभीर्य त्यांना आहे की नाही असा प्रश्नही विचारला जात आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे आरोग्य कर्मचाऱी मास्क न लावता तसाच उभा राहिला आहे. व्हिडीओ शूट करणारी व्यक्ती संबंधित कर्मचाऱ्याला विचारते की गाडीत कोरोना बाधित आहे का तर हो असंही उत्तर आरोग्य कर्मचारी देतो. 

याप्रकरणी आरोग्य विभागाकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. डॉक्टर मेघ सिंह सागर यांनी सांगितलं की, मी व्हिडीओ पाहिला नाही आणि असा काही प्रकार झाल्याचं माझ्यापर्यंत तरी पोहोचलं नाही. या प्रकाराची चौकशी करू आणि दोषींविरोधात कठोर कारवाई कऱण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT