Mehul Choksi Sakal Media
देश

मेहुल चोक्सीच्या घराबाहेर बँक, कोर्टाच्या नोटिसांचा ढीग!

गेल्या तीन वर्षांपासून दारावर चिकटवल्यात नोटिसा

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : पीएनबी घोटाळ्यात (PNB Scam) सुमारे १४ हजार कोटींचा चुना लाऊन फरार झालेला आरोपी मेहुल चोक्सी (Mehul Choksi) याच्या मुंबईतील फ्लॅटच्या (Mumbai Flat) दारावर विविध बँका, कोर्ट आणि तपास यंत्रणांच्या नोटिसा चिकटवण्यात आल्याचं निदर्शनास आलं आहे. गेल्या तीन वर्षांपासूनच्या या नोटिसा असून त्याचा ढीगच चोक्सीच्या घराबाहेर पडल्याचे फोटो समोर आले आहेत. एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे. (heap of bank court and investigation notices outside Mehul Choksi house in Mumbai)

पीएनबी घोटाळा सन २०१९ मध्ये उघड झाला तत्पूर्वी काही दिवसांपूर्वीच या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी हे आपल्या कुटुंबासह भारतातून पळून गेले. सुमारे १४ हजार कोटींचा मोठा घोटाळा करुन या दोघांनी परदेशात आश्रय घेतला. यांपैकी नीरव मोदी हा सध्या लंडनमधील तुरुंगात आहे. तर चोक्सीनं भारताचं नागरिकत्व सोडलं असून अँटिग्वा या देशातचं नागरिकत्व स्विकारलं आहे. भारतातून पळून गेल्यापासून तो याचं देशात होता. तीनचं दिवसांपासून चोक्सी अँटिग्वातून गायब झाल्याचं वृत्त आलं होतं. पण दुसऱ्याच दिवशीच तो डॉमिनिका देशात आढळून आला होता. या देशात बेकायदा प्रवेश केल्यानं त्याला स्थानिक पोलिसांनी अटक केली होती. पण चोक्सीविरोधात इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस असल्यानं चोक्सी सध्या डॉमिनिकात असल्याची माहिती इंटरपोलनं भारताला कळवली होती.

डॉमिनिकातून चोक्सीच्या प्रत्यार्पणाचा भारताचा प्रयत्न फसला

दरम्यान, डॉमिनिकातून चोक्सीचं भारताकडे प्रत्यार्पण होईल अशी भारताला आशा होती तशी तयारीही भारतीय उच्चायुक्तांनी सुरु केली होती. पण डॉमिनिकानं चोक्सीला थेट भारताकडे न सोपवता अँटिग्वाच्या हवाली केलं. त्यामुळे भारताचा चोक्सीच्या प्रत्यार्पणाचा प्रयत्न फसला. डॉमिनिका देशाला भारतानं कोरोनाच्या काळात मदत म्हणून मोठा लशींचा साठा पाठवला होता. त्यामुळे ही लस डिप्लोमसी चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी पथ्यावर पडेल अशी भारताला आशा होती. पण आंतरराष्ट्रीय इमिग्रेशन कायद्यांनुसार चोक्सी भारताचा नागरिक नसल्यानं त्याला डोमिनिकाला भारताकडं पाठवणं शक्य झालं नाही.

तपास यंत्रणांचं समन्स

चोक्सी भारतातून सन २०१९ पासून पळून गेल्यापासून आत्तापर्यंत त्याच्या मुंबईतील फ्लॅटवर विविध बँकांच्या, कोर्टाच्या आणि मोठ्या घोटाळ्यातील आरोपी असल्यानं तपास यंत्रणांच्या समन्स म्हणून नोटीसा त्याच्या घरावर चिकटवल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT