crime news crime news
देश

गर्लफ्रेंडच्या लग्नाचा सापळा; कुटुंबियांनी केला तरुणाचा घात

ई सकाळ टीम

चेन्नईतील डिंडीगुल जिल्ह्यातील एका २१ वर्षीय मुलाची बेदम मारहाण करत हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. भारतीराजा आपल्या प्रेयसीच्या घराजवळ गेला होता. तेथेच्या मुलीच्या कुटुंबियांनी त्याची हत्या केली.

चेन्नई- चेन्नईतील डिंडीगुल जिल्ह्यातील एका २१ वर्षीय मुलाची बेदम मारहाण करत हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. भारतीराजा आपल्या प्रेयसीच्या घराजवळ गेला होता. तेथेच्या मुलीच्या कुटुंबियांनी त्याची हत्या केली. कुटुंबीय दुसऱ्या मुलासोबत मुलीचे लग्न लावणार होते. ही बातमी ऐकल्यानंतर भारतीराजा प्रेयसीच्या घरी गेला होता. याप्रकरणी चार लोकांना अटक करण्यात आली आहे. भारतीराजा डिंडीगुल जिल्ह्यातील नाथमजवळ पुडुपट्टीचा रहिवाशी होता. त्याने कॅटरिंगचा कोर्स पूर्ण केला होता आणि एका खासगी हॉटेलमध्ये काम करत होता. (hearing the news girlfriend marriage lover reached house the family members beat him to death)

भारतीराजाचे तमिळनाडूच्या मुंगिलपट्टीच्या मुलई नगरमध्ये राहणाऱ्या २० वर्षीय परमेश्वरीवर प्रेम होते. दोघे गेल्या पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. जेव्हा घरच्यांना भारतीराजा आणि परमेश्वरीमधील प्रेमसंबंधांबाबत कळालं तेव्हा त्यांनी मुलीचं लग्न करण्याचा निर्णय घेतला. भारतीराजाला परमेश्वरीच्या लग्नाची माहिती मिळाली तेव्हा तो आपल्या मित्रासोबत तिच्या घराजवळ पोहोचला. भारतीराजाला घराबाहेर पाहताच परमेश्वरीचे नातेवाईक भडकले. यावेळी परमेश्वरीचे आई-वडील, भाऊ आणि इतर नातेवाईकांनी भारतीराजासोबत वाद घालत त्याला बेदम मारहाण केली.

परमेश्वरीच्या भावाने रागाच्या भरात एक दगड भारतीराजाच्या डोक्यात घातला. त्यात गंभीर जखमी झालेल्या भारतीराजाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी पाठवला.

भारतीराजाच्या वडिलांनी आरोप केलाय की, परमेश्वरीच्या कुटुंबियांनी प्लॅन करत त्याच्या मुलाची हत्या केली आहे. त्यांनी सांगितलं की, भारतीराजाला आधी नाथम येथे येण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर त्याला बेदम मारहाण करत त्याची हत्या करण्यात आली. दरम्यानी, पोलिसांन परमेश्वरीचे आई-वडील आणि तिच्या दोन भावांना अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT