World Cup 2023 eSakal
देश

World Cup 2023 : वर्ल्डकप गमावल्याचा धसका; बंगाल अन् ओडिशामध्ये दोघांनी संपवलं जीवन

आयसीसी वनडे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात झालेल्या पराभवामुळे कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न धुळीला मिळालं.

Sudesh

World Cup Final : रविवारी झालेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव झाला. या विश्वचषकात एकही सामना न हरलेल्या टीम इंडियाकडून सर्व भारतीयांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, अंतिम सामन्यात झालेल्या पराभवामुळे कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न धुळीला मिळालं.

क्रिकेट फॅन्ससाठी हा एक मोठा धक्का होता. हा विश्वचषक गमावल्याच्या दुःखामुळे दोन तरुणांनी आत्महत्या केल्याचंही समोर आलं आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये हे प्रकार घडले. (Cricket Fans Suicide)

पश्चिम बंगालमधील बांकुरा येथे राहणाऱ्या राहुल लोहार (वय 23) या तरुणाने रविवारी सामना संपल्यानंतर रात्री 11 च्या सुमारास आत्महत्या केली. त्याने आपल्या रुममध्ये जाऊन गळफास घेतल्याची माहिती त्याचा मेहुणा उत्तम सूर याने दिली. इंडिया टीव्हीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

ओडिशामध्येही असाच प्रकार

ओडिशा राज्यातील जयपूर जिल्ह्यात देखील असाच प्रकार समोर आला. 23 वर्षांच्या एका तरुणाने आपल्या घराच्या छतावर गळफास घेऊन आत्महत्या केली. देव रंजन दास असं या तरुणाचं नाव होतं. रविवारी रात्री क्रिकेट सामना संपल्यानंतर काही वेळातच त्याने आत्महत्या केली.

देव याच्यावर आधीपासूनच मानसिक उपचार सुरू होते. 'इमोशनल डिसऑर्डर सिंड्रोम'बाबत त्याच्यावर उपचार सुरू होते, अशी माहिती त्याच्या काकांनी दिली. सामना संपल्यानंतर तो तणावामध्ये घरातून बाहेर पडला होता, असं त्याच्या कुटुंबीयांनी सांगितलं. या दोन्ही प्रकरणांमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati Municipal Election 2026 : अमरावतीत 'या' तीन प्रभागात चुरशीची लढत, आमदार राणांसह मुख्यमंत्री फडणवीसांसाठी वर्चस्वाची लढाई

Highway Parking Rule: महत्त्वाची बातमी! महामार्गावरील पार्किंग नियमांमध्ये मोठे बदल; वाहनांसाठी नवीन दर निश्चित

NMMC Election: गणेश नाईक पार्टीविरोधात शिवसेनेची लढाई, जाहीरनामा प्रकाशनावेळी राजकीय आरोप-प्रत्यारोप; नेमकं काय घडलं?

Pimpri News : भारतीय तरुणाला कंबोडियात बनवले ‘सायबर स्लेव्ह’; तब्बल चार महिने खोलीत डांबले

Education News : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! एमएचटी-सीईटी, एमबीए-सीईटीला नोंदणी आजपासून सुरू; 'असा' करा अर्ज

SCROLL FOR NEXT