Heat wave Delhi 50 degrees. sakal
देश

Heat wave : उष्णतेच्या लाटेने देश होरपळला

दिल्ली ५० अंश तप्त

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली - देशभरात उन्हाळ्याच्या तीव्र लाटेने कहर केला असून राजधानी दिल्लीत रविवारी ४९ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेल्या ५५ वर्षांत राजधानीतील कमाल तापमानाने पन्नाशी गाठण्याची ही पहिलीच वेळ ठरली. गेले किमान १० वर्षे देशाच्या अनेक भागात सकाळी ८ पासून तप्त उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) या आठवड्यात दिल्लीसह पूर्व व उत्तर भारतात वादळी वारे व पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मात्र महाराष्ट्रासह मध्य व दक्षिण भारताला उष्णतेच्या लाटेपासून मुक्तता मिळण्याची चिन्हे नाहीत. यंदा मार्चमध्येच देशच्या सरासरी तापमानाने १२२ वर्षांचा विक्रम मोडला.

यंदाचा उन्हाळा भाजून काढणार याची चाहूल मार्चमध्येच लागली होती. सेंटर फॉर सायन्स ॅन्ड एन्व्हायरमेंटच्या अहवालानुसार यंदा मार्चमध्ये देशाचे सरासरी तापमान ३३ डिग्री तर एप्रिलमध्ये ते ४५ डिग्री सेल्सिअस राहिले. एल्डोरॅडो या जागतिक हवामान अंदाज संस्थेच्या संकेतस्थळानुसार मे महिन्यात जगातील सर्वांत १५ उष्ण शहरांत भारतातील तब्बल १० शहरे आहेत. यात गंगानगर, नौगाव, बाडमेर, पिलानी, झाशी, फलोदी, जैसलमेर, बिकानेर, कोटा व चुरू या शहरांत सध्या भाजून काढणारा उन्हाळा आहे. पाकिस्तानातील जकोकाबाद हे कालच्या दिवशी जगातील सर्वांत उष्ण शहर ठरले.

भारतात मार्च महिन्यातील इतके जास्त तापमान १९०१ नंतर प्रथमच नोंदविण्यात आले. देशाच्या सर्वाधिक म्हणजे १५ राज्यांत उष्णतेची लाट मार्चपासूनच कमीअधिक प्रमाणात कायम आहे. साधारणपणे मैदानी भागांत ३७ अंश तर पर्वतीय भागांत ३० अंशांवर तापमान पोहोचले की ती उष्णतेची लाट मानली जाते. यावर्षी मार्चनंतर देशात सातत्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. पूर्वी उन्हाळ्यात श्रीमंत लोक सिमला सारख्या थंड हवेच्या ठिकाणी जाऊन रहात. मात्र आता उन्हाळाच थंड हवेच्या ठिकाणांवर पोहोचला अशी परिस्थिती राहिली. कारण यंदा हिमाचल प्रदेश व जम्मू काश्मीरमध्ये मार्चमधील सरासरी तापमान ४२ डिग्री सेल्सिअस राहिले. या दोन्ही राज्यात मार्च महिन्यात अनुक्रमे २१ व १६ दिवस उष्णतेची लाट राहिली तीही परिस्थिती तेथे शतकानंतर प्रथमच उद्भवली. महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, चंडीगड व बिहार-झारखंडच्या काही भागांत १९ मे पर््यंत उष्णतेची लाट कायम राहील व तापमान ४४ अंशांच्याच आसपास राहील असा अंदाज वर््तविण्यात आला आहे. या दरम्यान उत्तर भारतात काही ठिकाणी पावतचाही अंदाज आहे.

दिल्लीत २९ एप्रिल १९४१ नंतर प्रथमच एप्रिलमधील तापमान यंदा ४५ अंशांच्या वर गेले तर दिल्ली-गुरूग्राममध्ये १० मे १९६६ नंतर काल (१५ मे) मे महिन्यातील प्रथमच तापमान ४९ अंशांच्या पुढे गेले. भीषण उन्हाळ्याने व हवेच्या तप्त झळांमुळे (लू) सर्वसामान्यांचे हाल सुरू आहेत. रोजीरोटीसाठी घराबाहेर पडणे अत्यावश्यक असणाऱ्यांसाठी सध्याच्या वातावरणात मोठे संकटच उद्भवले आहे.

दरम्यान आयएमडीने या आठवड्यात दिल्लीसह उत्तर व पूर्व भारतातील काही राज्यांत हलका पाऊस होईल असा अंदाज वर्तविला आहे. जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशासह हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालच्या काही भागांतही पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यंदा मान्सून वेळेआधी येणार असे सांगितले जात असले तरी देशाचा सारा भाग मान्यूनने व्यापण्यासाठी जूची अखेरच येणार असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. दिल्लीत सर्वसाधारणपणे २७ जूनला मान्सूनचा पाऊस अपेक्षित असतो तो यंद १५ जूननंतर येईल असा अंदाज आहे. तोवर पूर्वमोसमी पावसाचा एखाद शिडकावा झाला तरी नागरिकांची सध्याच्या भीषण उन्हाळ्यातून काही तास तरी सुटका होईल या अपेक्षेत दिल्लीकर आहेत.

सध्याची उष्णतेची लाट चालू आठवडाभर कायम राहण्याची शक्यता आहे.मात्र आठवड्यात दिल्ली, डोंगराळ राज्ये व उत्तर भारतात वादळी वाऱयांसह हलका पाऊस पडेल असा अंदाज हे.

- मृत्युंजय महापात्रा, महासंचालक, आयएमडी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inspirational : Glenn Phillips ची पायलट बनण्यामागची कहाणी; ८ महिने क्रिकेटपासून दूर, पण पठ्ठ्याला स्वस्थ कुठे बसवत होतं...

सिरियलमध्ये आली देशभक्त नागिण! इस्रोच्या रॉकेटला केला सलाम, नेटकऱ्यांनी एकता कपूरला केलं ट्रोल

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

अनधिकृत गॅस गोदामातून सिलिंडरची विक्री, पुरवठा विभागाचा छापा; ५७ सिलिंडर केले जप्त, कुठं झाली कारवाई?

Maharashtra Weather: महाराष्ट्राच्या 'या' भागांमध्ये गुरुवारी पावसासह गारपीट; हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT