Jalna Breaking News Girl Boy Committed Suicide Before Railway 
देश

Heavy Rain : उत्तर भारतात पावसाचा हाहाकार; रेल्वे सेवा विस्कळीत!

सकाळ डिजिटल टीम

Heavy Rain : देशात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. पर्यायी काही ठिकाणी पावसाने विध्वंसक रूप घेतले आहे. याचा फटका हा गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांना बसला आहे. दोन्हीही राज्यात पावसामुळे नदी नाल्यांना महापूर आला आहे.

माही नदीवर बांधलेला बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे. तर चंबळ आणि क्षिप्रा नद्यांना सुद्धा पूर आला आहे.पर्यायी रेल्वे वाहतुकीवरही परिणाम होत आहे.

झाबुआ जिल्ह्यातून जाणाऱ्या दिल्ली-मुंबई रेल्वेच्या अप ट्रॅकचा काही भाग खचला आहे. दिल्लीकडे जाणारी रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली आहे.तर हा ट्रॅक पुन्हा सुरु करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. 300 मजूर आणि तांत्रिक पथके ट्रॅकच्या दुरुस्तीचे कार्य करत आहेत. लवकरच हा ट्रक सुरु होईल अशी आशा केली जात आहे.

तर मुंबई-अहमदाबाद मार्गावरील भरूच आणि अंकलेश्वर स्थानकांदरम्यान रविवारी रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होती.याचे कारण म्हणजे, नर्मदेने पाणी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

अशावेळी प्रवाशांच्या माहितीसाठी रेल्वेने मदतक्रमांक जाहीर केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Red Alert : मुंबईला पावसाचा तडाखा! कांदिवली, मालाडमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; हवामान खात्याकडून 'रेड अलर्ट' जारी, पुढील 3 तास महत्त्वाचे

Maharashtra Government Decision : मोठा निर्णय! राज्यातील २९ जिल्ह्यांत नवीन अप्पर जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालये होणार; सामान्यांचा वेळ, पैसा, त्रास वाचणार

Latest Marathi News Live Update : भर पावसात वाहतूक कोंडीने पुणेकर हैराण

Chhatrapati Sambhajinagar: अनेक मंत्र्यांशी संबंध, अन्न व नागरी पुरवठा विभागात नोकरी लावतो; तरुणाला २१ लाखांना गंडा

Mumbai Rain: पहिल्याच पावसाने मुंबईची पोलखोल! वर्दळ नसल्याने मोठी दुर्घटना टळली; नेमकं कुठे आणि काय घडलं?

SCROLL FOR NEXT