Biparjoy Cyclone esakal
देश

Cyclone Biparjoy: बिपरजॉय चक्रीवादळापूर्वी गुजरातमध्ये मुसळधार पाऊसाची हजेरी, 30 हजार लोकांना हलवलं सुरक्षित स्थळी

बिपरजॉय चक्रीवादळापूर्वी गुजरातमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली

अंकिता खाणे (Ankita Khane)

बिपरजॉय चक्रीवादळ तीव्र झाले असून ते गुजारतकडे सरकत आहे. याच पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. अरबी समुद्रातून येणारे हे वादळ गुजरातमध्ये धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे वादळ खूप भीषण स्वरूपाचे असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

दरम्यान, बिपरजॉय चक्रीवादळापूर्वी गुजरातमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून आत्तापर्यंत 30 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. उद्या 15 जून रोजी बिपरजॉय चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. गुजरात सरकारही सतर्क झाले असून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी काल मंगळवारी चक्रीवादळाच्या तयारीची आढावा बैठक घेतली. केंद्र सरकार आणि राज्यांनी मिळून गेल्या 9 वर्षामध्ये अनेक आपत्तींना तोंड दिले आहे. या नवीन आपत्तीला तोंड देण्यासाठी सरकार पूर्णपणे तयार असल्याचं अमित शाह यांनी म्हंटलं आहे. 'बिपरजॉय' चक्रीवादळामुळे होणारे संभाव्य नुकसान कमी करणे हे आमचे उद्दिष्ट असल्याचे शाह म्हणाले आहेत.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी लोकांना वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केलं आहे. तर 30 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती दिली आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये पावसाला सुरुवात झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: रक्षाबंधनाआधी सोनं स्वस्त! सलग तिसऱ्या दिवशी भाव घसरले, आज 10 ग्रॅमचा दर किती?

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल खोळंबल्याने प्रवाशांची तारांबळ

LUCKY ZODIAC SIGNS: फक्त ८ दिवस थांबा! ‘या’ ३ राशींचं नशीब अचानक पलटणार; पैसा, यश अन् मोठ्या फायद्याचे संकेत ,तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates : मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांचा कडकडीत कारवाईचा बडगा, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Sangola Water: पक्ष, गट, राजकारण बाजूला अन् शेतकरी एकवटले! सांगोल्यात पाण्याच्या लढ्याचा ‘सांगोला पॅटर्न’

SCROLL FOR NEXT