देश

हेलिकॉप्टर दुर्घटनेत दोन जवानांनी गमावले प्राण

सकाळ डिजिटल टीम

जम्मूतील उधमपूर जिल्ह्यात झालेल्या लष्कराच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे.

जम्मूतील उधमपूर जिल्ह्यात झालेल्या लष्कराच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचं म्हटलं जात आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या पायलट आणि को पायलटना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारावेळी त्यांची प्राणज्योत मालवली. हेलिकॉप्टरने नगरोटामधून उड्डाण केलं होतं. खराब हवामानामुळे फोर्स लँडिंग करावे लागले आणि त्यातच हेलिकॉप्टर क्रॅश झालं. या दुर्घटनेत लष्करातील मेजर रोहित कुमार आणि मेजर अनुज राजपुत यांनी प्राण गमावले आहेत.

धुक्याचं प्रमाण जास्त असल्यानं हेलिकॉप्टर खाली येताना दिसलं. मात्र ते क्रॅश होऊन खाली कोसळलं की क्रॅश लँडिंग झालं हे स्पष्ट दिसलं नसल्याचं स्थानिकांनी सांगितलं होतं. भारतीय लष्कराकडून हेलिकॉप्टर कोसळल्याचं सांगण्यात आलं होतं.

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टर लष्कराचं असल्याचं म्हटलं. शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. यासाठी किमान एक ते दीड तास लागेल. धुकं जास्त असल्यानं शोधमोहिमेत अडथळा येत आहे असंही पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान, हेलिकॉप्टरमधील दोन्ही पायलट सुरक्षित असल्याचं म्हटलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT