Morbi Bridge Collapse esakal
देश

Morbi Bridge Collapse: मोरबी दुर्घटनाग्रस्तांना हवी ती मदत करा; मोदींकडून 'या' सूचना

संतोष कानडे

मोरबीः गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील माचू नदीवरील पूल कोसळल्याने १३५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक लोक जखमी झालेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांची भेट घेतली आणि परिस्थितीचा आढावा घेतला.

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची एक बैठक आज संपन्न झाली. यावेळी पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांच्या संपर्कात राहा, त्यांना काय हवं नको ते बघा. शिवाय या घटनेची सखोल चौकशी करण्यासंबंधीचे मोदींनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

आज (मंगळवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोरबी येथील जिल्हा रुग्णालयात जात जखमींच्या प्रकृतीची चौकशी केली. परिस्थितीचा आढावा घेऊन बचावकार्यामध्ये सहभागी अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. आयोजित बैठकीत मोदी म्हणाले की, या दुर्दैवी दुर्घटनेमुळे अनेक परिवार उघड्यावर आले आहेत. त्यांच्यासोबत राहाणं आपलं काम आहे. यावेळी अधिकाऱ्यांनी दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या मदतीसंदर्भात माहिती दिली.

दरम्यान, आज अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर गंभीर आरोप केलेले आहेत. पूल बनवणाऱ्या कंपनीकडून भाजपला फंडिंग होत होतं, हे खरं आहे का? असं केजरीवाल म्हणाले. राज्यात एवढी गंभीर दुर्घटना घडलेली असतांना मुख्यमंत्र्यांनी पदावर राहू नये, सरकारने पायउतार व्हावं, असंही आवाहन त्यांनी केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet: गरिबांसाठी हक्काची घरे, शेतकऱ्यांनाही दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठ्या निर्णयांची घोषणा

District Bank election:चुकीचे लोक नकोत, म्हणून स्वाभिमान बाजूला ;डॉ. सुजय विखे पाटील ; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शेतकऱ्याचे हित महत्त्वाचे

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Marathi News Live Updates: आंबेगाव तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीवर धडक कारवाई; सात हायवा जप्त

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT