Hemant Soren Sakal
देश

Hemant Soren : हेमंत सोरेन यांना धक्का! ईडी कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज; काय आहे प्रकरण?

संतोष कानडे

ED on Hement Soren : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या तात्पुरत्या जामिनावर शनिवारी ईडी कोर्टात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावली. हेमंत सोरेन यांच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं होतं की, त्यांचे चुलते राजाराम सोरेन यांचं निधन झालं आहे. त्यांच्या क्रियाकर्मासाठी १३ दिवसांचा जामीन द्यावा, अशी मागणी केली होती.

परंतु ईडी कोर्टाने हेमंत सोरेन यांना तात्पुरता जामीन देण्यास नकार दिला आहे. कोर्टाने सोरेने यांची याचिका फेटाळून लावली आहे.

दरम्यान, जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने हेमंत सोरेन यांना अटक केली आहे. सध्या ते होटवार जेलमध्ये आहेत. या प्रकरणी कोर्टात सुनावणी झाली आणि दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने निर्णय सुरक्षित ठेवला.

जामिनाच्या याचिकेत म्हटलं होतं की, चुलते राजाराम सोरेन यांचं निधन झालं आहे. त्यांच्या अंत्यविधीमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना १३ दिवसांचा तात्पुरता जामीन मिळावा, अशी मागणी केली होती.

यापूर्वी हेमंत सोरेन यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. २४ एप्रिल रोजी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात म्हटलं होतं की, ईडीच्या अटकेविरोधातील याचिकेवर हायकोर्ट निर्णय देत नाहीये. उच्च न्यायालयाने २८ फेब्रुवारी रोजी आपला निकाल राखून ठेवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira Road Clash : मीरारोडमध्ये दोन गटात तुफान हाणामारी; २० रिक्षांची केली तोडफोड, मुलीच्या छेडछाडीवरून झाला वाद

अहान पांडे-शर्वरी वाघच्या चित्रपटाचं शूटिंग यूकेमध्ये, अ‍ॅक्शन आणि रोमांसचा परिपूर्ण संगम

Fake Medicine : औषध भेसळ प्रकरण; दोषी कंपन्यांवर कारवाईची मागणी, विक्रेत्यांना त्रास नको

Pune Crime : पुण्यात दुचाकीस्वार चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेसह तिघांचे दागिने लंपास

Latest Marathi News Live Update : एसटी आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक

SCROLL FOR NEXT