Talib Sakal
देश

‘हिज्बुल’च्या म्होरक्याला पकडले

काश्‍मीरमधील ‘टार्गेट किलिंग’मध्ये सहभाग असल्याचा संशय

सकाळ वृत्तसेवा

जम्मू - हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याला सुरक्षा दलांनी अटक केली. तालिब हुसेन गुज्जर असे त्याचे नाव आहे. काश्‍मीरमध्ये सुरू असलेल्या पंडितांच्या हत्यांमागे त्याचा हात असल्याचा संशय आहे. जम्मू-काश्‍मीर पोलिस, १७ राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफ यांनी राबवलेल्या संयुक्त मोहिमेत तालिबला किश्‍तवाड येथून शनिवारी अटक करण्यात आली. वेगवेगळ्या कारवायांमुळे तो गेल्या सहा वर्षांपासून त्याचा शोध घेण्यात येत होता. तो किश्तवाड येथील नागसेन येथे लपून बसल्याची माहिती गुप्तचरांकडून मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

खोऱ्यात दहशतवाद पसरवण्याबरोबरच येथील स्थानिक तरुणांचे ‘ब्रेन वॉश’ करून त्यांना हिज्बुलमध्ये भरती करायचे काम देखील तो करत होता. मागील काही वर्षांपासून काश्मिरात झालेल्या अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांत तालिबचा सहभाग होता. त्यामुळे तो जिवंत हाती लागणे हे काश्मीर पोलिस आणि सैन्यदलाचे मोठे यश मानले जात आहे. दरम्यान ‘टार्गेट किलिंग’ प्रकरणात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांची ओळख पटली असून, आत्तापर्यंत अशा स्वरूपाची ४७ ‘मोड्यूल’ उद्ध्वस्त करण्यात यश आले आहे असे जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंह यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ग्राहक पैसे पूर्ण देतात, तर वापर न झालेला डेटा मध्यरात्रीच का रिसेट करता? टेलिकॉम कंपन्यांना राघव चड्ढांचा प्रश्न, ही डिजीटल लूट

Dhule Crime : धुळ्यात भररस्त्यात जबरी चोरी करणाऱ्या दोघांना बेड्या; शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

"त्या दिवशी ताज हॉटेलला जाणार होतो.." अभिनेता अर्जुन रामपालने सांगितला 26/11 अनुभव; "बॉम्बस्फोट झाला.."

Gold Rate Today: सोनं 30% तर चांदी 50% कोसळली! 5 तासांत सोनं 11,000 रुपयांनी स्वस्त; सध्याचा भाव किती? आता खरेदीची सुवर्णसंधी?

कच्च्या तेलाच्या दराचा भडका उडणार, १३५ डॉलरवर पोहोचण्याची भीती; महागाई वाढणार?

SCROLL FOR NEXT