highway helpline service.

 

esakal

देश

Highway Emergency Helpline : ‘हायवे’वर गाडी बंद पडली, पेट्रोल संपलं चिंता नाही; फक्त एक फोन करा अन् तुमचं काम झालं!

National Highway Helpline : जाणून घ्या, नेमकी काय आहे ही सुविधा आणि कोणता आहे तो फोन नंबर?

Mayur Ratnaparkhe

Highway emergency support via 1033 helpline : जर तुम्ही महामार्गावरून प्रवास करत असाल आणि तुमच्या गाडीमधील पेट्रोल संपलं. तर अशावेळी आता तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण, अशा परिस्थितीत तुम्हाला केवळ एक फोन करायचा आहे आणि तुमच्या गाडीसाठी पेट्रोल उपलब्ध होणार आहे. एवढंच नाहीतर गाडीत काही समस्या उद्भवली तरी देखील तुम्हाला जागेवरच मदतही मिळणार आहे. 

यासाठी अशा परिस्थितीत तुम्हाला केवळ १०३३ वर कॉल करायचा आहे. हा क्रमांकावर तुम्ही फोन केल्यास, नियंत्रण कक्ष तुमचे लाईव्ह लोकेशन ट्रेस करतो. यानंतर तुमच्यापासून जवळ असणाऱ्या पेट्रोल व्हॅन किंवा मदत पथकाला अलर्ट करते. जर तुमचे इंधन संपले तर जागेवरच पाच लिटरपर्यंत इंधन पुरवले जाते. तुम्हाला केवळ  पेट्रोल किंवा डिझेलची किंमत भरावी लागते.

विशेष म्हणजे यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. जर तुमचे वाहन सुरू झाले नाही तर यांत्रिक सहाय्य किंवा टोइंगची सुविधा देखील प्रदान केली जाते. तसेच अपघात झाल्यास, रुग्णवाहिका आणि पोलिसांना ताबडतोब सूचित केले जाते. त्यामुळेच गरजू प्रवाशांना माहिती देण्यासाठी राष्ट्रीय महामार्गांवर दर काही किलोमीटरवर १०३३ क्रमांकाचे बोर्ड लावले जातात.

१०३३ हेल्पलाइन क्रमांकाव्यतिरिक्त, तुम्ही पेट्रोल-डिझेलसाठी ८५७७०५१००० आणि ७२३७९९९९४४ सारख्या क्रमांकांवर देखील कॉल करू शकता. अनेक इंधन कंपन्या मागणीनुसार इंधन वितरीत करतात. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मते, कॉल केल्यानंतर साधारणपणे २० ते २५ मिनिटांत मदत मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Evacuation from Iran : इराणमधील संकटात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी विमाने सज्ज; परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती

VIJAY HAZARE TROPHY Semi Final : विदर्भाचा पोट्टा अमन मोखाडेने इतिहास रचला; संघाला अंतिम फेरीत घेऊन गेला, कर्नाटकचा संघ हरला!

Exit Poll: ठाणेसह नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर आणि वसई-विरारमध्ये कोण बाजी मारणार? एक्झिट पोलची आकडेवारी समोर

Kolhapur Corporation Exit Poll : सतेज पाटील बालेकिल्ला राखणार का?, कोल्हापुरात कोणाची सत्ता; एक्झिट पोल आला समोर

Akola Election Analysis : अकोला महापालिकेत कुणाला मिळेल ‘लाडक्या बहिणींची’ साथ? भाजपासह राष्ट्रवादी-शिंदेसेनेची प्रतिष्ठा पणाला!

SCROLL FOR NEXT