Karnataka Hijab Controversy esakal
देश

हिजाब बंदीचा निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना धमकी; दोघांना अटक

यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता.

सुधीर काकडे

Hijab Row : कर्नाटकच्या एका महाविद्यालयात हिजाब घालून येणाऱ्या विद्यार्थींनींना रोखण्यात आल्याने देशभरात एक मोठा वाद उभा राहिला होता. अखेर हे प्रकरण न्यायालयात गेलं आणि न्यायालयाने या प्रकरणाचा निवाडा केला. महाविद्यालयात हिजाबवर बंदीचा निकाल कर्नाटक उच्च न्यायालयाने (Karnataka High Court) १५ मार्च रोजी दिला. त्यानंतर आता या प्रकरणात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. हा निकाल देणाऱ्या न्यायाधीशांनाच धमकी देण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी या प्रकरणात तिरुनेलवेली येथून कोवई रहमतुल्लाह, तर एस. जमाल मोहोम्मद उस्मानी या ४४ वर्षीय व्यक्तीला तंजावर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कर्नाटक हायकोर्टाच्या तीन सदस्यीय पीठाने हा निकाल दिला आहे. हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही, त्यामुळे महाविद्यालयात येताना विद्यार्थींनींना हिजाब घालता येणार नाही, असा निर्णय कर्नाटक हायकोर्टाने दिला आहे. तसंच यावेळी शैक्षणिक संस्थांनी ठरवलेल्या गणवेशाचं पालन करण्यास सांगणारा कर्नाटक सरकारचा ५ फेब्रुवारीचा आदेशही न्यायालयानं कायम ठेवला.

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात अनेक धार्मिक अल्पसंख्याक समुदाय तामिळनाडूमध्ये निदर्शनं करत आहेत. तमिळनाडूच्या मदुराईमध्ये गुरुवारी निदर्शनादरम्यानची अशीच एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. या क्लिपमध्ये तामिळनाडू तौहीद जमात (TNTJ) ऑडिटींग कमिटीचे सदस्य कोवई रहमथुल्ला हे कथितपणे म्हणाले की 'चुकीचा' निर्णय देणार्‍या न्यायाधीशाची झारखंडमध्ये मॉर्निंग वॉक दरम्यान हत्या करण्यात आली आहे. आमच्या समाजात काही भावनिक लोक आहेत. तसंच न्यायाधीशांना धमकी देत तो म्हणाला की, "कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जर काही झालं तर...भाजप आम्हाला दोष देण्यासाठी तयार आहेच."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू; मोहफुले वेचताना हल्ला, मृतदेह फरकटत नेऊन पायाचे लचके तोडलं अन्..

Malad East Mumbai Accident : मुंबईत पुन्हा एकदा 'खड्डा' ठरला कर्दनकाळ; बांधकाम व्यावसायिकाच्या एका चुकीमुळं 8 वर्षांच्या दिव्यांशचा करुण अंत, चेंडू काढायला गेला अन्...

Ashok Kharat: अन्यथा असे आणखी अशोक खरात उदयास येतील; उत्तर महाराष्ट्रात अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त, संपत्ती लुटली, तरी सरकार निष्क्रिय!

Latest Marathi News Live Update : नाशिक पोलिसांकडून संगमनेर ऍसिड हल्ला प्रकरणातील संशयिताचे रेखाचित्र प्रसिद्ध

Ashok Kharat Case : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर फरार ? रुपाली पाटील यांच्या पोस्टने खळबळ

SCROLL FOR NEXT