Hijab Controversy SAKAL
देश

हिजाब बंदीविरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची सुप्रीम कोर्टात धाव

शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर बंदीच्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने (AIMPLB) सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

सकाळ डिजिटल टीम

काही दिवसांपूर्वी कर्नाटक उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थात हिजाब बंदी योग्य असल्याचा निर्णय दिला होता. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर बंदी घालण्याच्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने (AIMPLB) सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याचिका फेटाळल्या. (All India Muslim Personal Law Board runs in Supreme Court against hijab ban)

कर्नाटकात शाळा आणि महाविद्यालयात हिजाबवरून वाद निर्माण झाल्यानतंर या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. शाळा, महाविद्यालयात हिजाब बंदीविरोधात अनेक याचिका दाखल केल्या होत्या. या प्रकऱणी कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रितू राज अवस्थी, न्यायाधीश कृष्णा दीक्षित आणि न्यायाधीश जेएम खाजी यांच्या खंडपीठाने निर्णय दिला. सध्या राज्य सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव उडुपी आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यातील शाळा, कॉलेजेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानंतर शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य असल्याचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला होता. हिजाबवरून झालेल्या वादानंतर याबद्दल याचिका दाखल करण्यात आली होती. एका महाविद्यालयात हिजाब घालून आलेल्या विद्यार्थीनींना प्रवेश नाकारल्यानंतर वाद निर्माण झाला होता. हिजाब हा मुस्लिम धर्मात अनिवार्य नसल्याचंही न्यायालायने म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे; मुंबई दौरा तूर्तास स्थगित, सरकारला ३ महिन्यांचा थेट अल्टिमेटम; ​मंत्री विखे पाटील, दादा भुसे अन् सुरेश धसांच्या मध्यस्थीला यश

Ganpati Panchayatan Sansthan Sangli : ‘किमान दोघांना लोळवण्याची ताकद’; अभिनेत्री भाग्यश्रीच्या पूजेवर विजयसिंह राजे संतापले

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात नव्या कमी दाबाची शक्यता; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज

Aaditya Thackeray: दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरेंचे मौन सुटले; म्हणाले, ‘मी त्यांना कधीही भेटलेलो नाही’

IND vs AFG 3rd T20I: वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार, पण मग Playing XI मधून बाहेर कोण बसणार? भारताकडे आज व्हाईटवॉश देण्याची संधी

SCROLL FOR NEXT