टिकैत sakal
देश

हिजाब पेक्षा हिसाब कडे लक्ष द्या - राकेश टिकैत

हिजाबावर नव्हे तर देशातील बॅंकांच्या हिशोब यावर आंदोलनाची आवश्यकता आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली: कर्नाटकमधून सुरू झालेल्या हिजाब प्रकरणावर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली असून हा वाद अनावश्यकरीत्या तापविला जात असल्याचे म्हटले आहे. हिजाब पेक्षा हिसाब कडे लक्ष द्यावे, अन्यथा देशाचे मोठे नुकसान होईल अशी टिप्पणी त्यांनी केली.

उत्तर प्रदेशसह पाचही राज्यांत निवडणूक प्रचारात याचा जोरदार वापर सुरू आहे. हा मुस्लिम समाजाचा अंतर्गत प्रश्न आहे व यात इतरांनी बोलू नये अशी टिकैत यांची भूमिका होती. सोमवारी त्यांनी ट्विट केले. ताज्या बँक घोटाळ्याचा संदर्भ देऊन त्यांनी म्हटले आहे की, की हिजाबावर नव्हे तर देशातील बॅंकांच्या हिशोब यावर आंदोलनाची आवश्यकता आहे. माझ्या प्रिय देशवासीयांनो, अशीच परिस्थिती राहिली तर देश विकला जाण्यास वेळ लागणार नाही. मात्र आम्ही असे कदापी होऊ देणार नाही.

पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर टिकैत यांनी, हिंदू-मुस्लिम राजकारणाचा काळ संपल्याचे भाकीत केले होते. बेलगाम सरकारांवर अंकुश ठेवणे व शेतकरी-गरीब व ग्रामीण जनतेबद्दलच्या द्वेषाच्या राजकारणावर मते पडत आहेत व हीच जनता यापुढेही तसेच मतदान करेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: इराणचा मोठा निर्णय! होर्मुज समुद्रधुनी केली खुली, जगभरातलं इंधन संकट टळलं; आता हल्ले करणार नसल्याचं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update: क्रिकेट चाहत्यांच्या सोयीसाठी मुंबई आणि अहमदाबाद तसेच पुणे ते अहमदाबाद दरम्यान विशेष गाड्या

Treatment deadline: रुग्णालयात ३० मिनिटांत उपचार सुरू करणे बंधनकारक; नवीन आपत्कालीन नियमावली लागू, प्रशासनाचा कडक इशारा

T20 WC, IND vs NZ: 'अरे तेच तेच काय बोलता, काहीतरी वेगळं...' न्यूझीलंड कर्णधाराच्या वॉर्निंगवर सूर्यकुमारचं थेट उत्तर

स्ट्रेस फ्री झोन, शांत आणि योग क्षेत्र, अर्बन फॉरेस्ट अन् बरंच काही! मुंबईत अनोखे उद्यान उभारणार; पण कुठे? वाचा संपूर्ण योजना...

SCROLL FOR NEXT